तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्या
कुरखेडा/ गडचिरोली (Kurkheda Bull Death) : आज बारा वाजेच्या सुमारास कढोली खरकाडा रस्त्यालगत असलेल्या शेतात बैल चरत असताना अचानक वीज कोसळल्याने बैल जागीच मरण पावल्याने बैल मालक दत्तेश्वर बळीराम मानकर कढोली यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळून त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांची महसुल विभागाकडे मागणी
या घटनेची माहिती मिळताच कुरखेडा तालुका समन्वय व पुर्नरविलोकन समिती अध्यक्ष तथा भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये यांनी घटनास्थळी भेट देत या संदर्भात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कुष्णाजी गजबे, तहसिलदार रमेश कुमरे, पशुवैद्यकिय अधिकारी भामरे यांना संपर्क करून तात्काळ पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी त्यांना मागणी केली आहे. यावेळी भाजपा तालुका महामंत्री चंद्रकांत चौके, विजय पाटील नाकाडे, रोशन भोयर, फाल्गुन ठाकरे, राजेश मानकर व गावातील नागरिक उपस्थित होते.