चौकशी करीता काही संशयीत पोलीसांचा ताब्यात
कुरखेडा/गडचिरोली (Kurkheda crime murder) : कुरखेडा तालूक्यातील चिखली येथील जितेश भोवनदास पगडवार वय २८ या अविवाहित यूवकाचा रक्ताने माखलेला मृतदेह आज शूक्रवार रोजी पहाटे चिखली- वडेगांव मार्गावर स्मशानभूमी जवळ असलेल्या सिडी वर्क जवळ आढळून आला. यामूळे गावात एकच खळबळ माजली आहे. मृतक हा अविवाहित होता व तो काल सांयकाळीच घरून बाहेर पडला होता. मात्र रात्र होऊनही तो घरी परत न आल्याने कूटूंबियानी त्याचा शोध सूरू केला. आज पहाटेचा सूमारास त्याचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर आढळून आला. त्याचा डोक्यावर व शरीरावर धारदार हत्याराने मारण्यात आल्याचे (crime murder) प्रथमदर्शनी दिसून आले.
या घटनेची माहिती लगेच पोलीस स्टेशन कूरखेडा (police station kurkheda) येथे देण्यात आली. ठाणेदार महेन्द्र वाघ यानी पहाटेच घटणास्थळ गाठत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणी करीता शववाहिनीने उपजिल्हा रूग्णालय कूरखेडा (sub district hospital) येथे आणले. मृतकाचे काही कारणावरून गावातीलच काही यूवकांशी वाद होता अशी चर्चा आहे. पोलीसानी अद्यात आरोपी विरोधात हत्येचा गून्हा दाखल करीत संशयावरून गावातीलच काही यूवकाना ताब्यात (arrested) घेत चौकशी सूरू केली आहे.