गडचिरोली/ कुरखेडा (kurkheda Police) : कुरखेडा (वाकडी )सतीनदीचा पात्रात सूरू असलेली मोहफूलाची दारू भट्टी कूरखेडा पोलीसानी केली. उध्वस्त तालूका मूख्यालयापासून जवळच असलेल्या वाकडी सतीनदीचा पात्रात मोहफूलाची अवैध दारू भट्टी (illegal mogul wine)सूरू असल्याचा गोपनीय माहीती वरून दि.१ सप्टेबंर रविवार रोजी सांयकाळी ५ वाजता येथे कूरखेडा पोलीसानी धडक( kurkheda police trap) देत अवैध भट्टी उध्वस्त केली व ३ आरोपी ना अटक करुन(arrest) त्यांच्या विरोधात गून्हा दाखल करीत ६० लिटर दारू जप्त करण्यात आली.
गोपनीय माहीती वरून वाकडी सतीनदीचा पात्रात पोलीसानी धडक दिली. यावेळी आरोपी अंकूश नैताम वय २८ तूळशीदास राऊत वय २० व कूंडलीक उईके वय ४५ सर्व रा.मोहगाव ता. हे अवैधपणे भट्टी लावत मोहफूलाची दारू गाळत असल्याचे आढळून आल्याने त्यांचा विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा ६५(ई) ६५(फ) ८३ अन्वये गून्हा दाखल करण्यात आला. तसेच घटणास्थळावरून ६० लिटर मोहफूलाची अवैध दारू किमत १८ हजार रू. जप्त करण्यात आली. सदर कार्यवाही ठाणेदार महेन्द्र वाघ यांचा मार्गदर्शनात कूरखेडा पोलीसानी केली.