कुरखेडा (Kurkheda Road) : कुरखेडा तालुक्यातील (Kurkheda taluka) कुंभीटोला येथे बहुप्रतीक्षेनंतर मनरेगा अंतर्गत पांदन रस्त्याचे काम सुरू झाल्याने मजूर वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले आहे. (Maharashtra Rural Employment Guarantee Scheme) महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अशोक कापगते ते आनंदराव इस्कापे यांच्या शेतापर्यंत जाणारा पांदण रस्ता हा मंजूर झाला आहे. या पांदण रस्त्यावर सरासरी १५० ते २०० मजूर काम करणार आहेत.
अखेर कुंभीटोला येथे पांदण रस्त्याचे काम सुरू
मजुरांना उन्हाळ्यामध्ये हाताला रोजगार हमीचे (Employment Guarantee) काम मिळाल्याने उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. पांदण रस्ता मंजूर करण्याकरिता ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व पंचायत समिती अंतर्गत असलेल्या मनरेगातील कर्मचारी यांचा विशेष सहकार्य लाभल्याने मजुरांनी त्यांचे पण आभार मानले आहे. काही दिवस का होईना रोजगार मिळाला, याचे मजुरांना समाधान आहे.