कुरखेडा (Kurkheda Road) : कुरखेडा कोरची मार्गावरील वाहतुक वळविण्याचे (Kurkheda collector) जिल्हाधिकारी यांचे आदेश धडकले. कुरखेडा कोरची मार्गावर सती नदीवरील पुलाचे बांधकाम मागील दोन ते तीन महिन्यापासून सुरु असुन येत्या पावसाळ्यात वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो करिता, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन गडचिरोली यांनी (Kurkheda Road) कुरखेडा कोरची मार्गावरील वाहतुक वळविण्याचे आदेश दिले.
हलक्या स्वरूपाच्या वाहनांना कुरखेडा चिचटोला आंधळी वाघेडा मालदुगी गोठणगाव फाटामार्गे तर जड वाहनाकरिता वडसा आरमोरी वैरागड गोठणगाव फाटा(कुरखेडा) मार्गे कोरची असा मार्गाने वाहतुक वळविण्याचे आदेश निर्गमित केले आहे. परंतु या (Kurkheda Road) आदेशात एसटी बसेस चा उल्लेख नसल्याने शालेय विद्यार्थ्यांचे पालक द्विधा स्थितीत आहेत.