जास्त रडणारा निघाला आरोपी
कुरुंदा पोलिसांनी शिताफिने केले प्रकरण उघड
कुरुंदा पोलिसांनी शिताफिने केले प्रकरण उघड
वसमत (Kurunda police Case) : तालुक्यातील कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीतील भेंडेगाव शिवारात डोक्याला मार लागलेला मृतदेह आढळला रविवारी आढळला होता मयत हा शेतात काम करणारा सालगडी होता हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय कुरुंदा पोलिसांना आला व त्यांनी सखोल चौकशी केली असता हा अनैतिक संबंधात येणाऱ्या नवऱ्याचा प्रियकर व पत्नीने मिळून काटा प्रकार असल्याचे समोर आले पोलिसांनी चौदावे रत्न दाखवतात आरोपी प्रियकर व पत्नीने सर्व घटनाक्रम कबूल केला आणि एकच खळबळ उडाली दोन्ही आरोपींना (Kurunda police Case) पोलिसांनी अटक केली असून गुन्हा नोंदवला आहे.
वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथील कपील सोनटक्के यांचे शेतातील आखाड्यावर शिवाजी पोटे या शेतात काम करणाऱ्या शेतमजुराचा मृतदेह रविवारी सकाळी आढळला कोणीतरी अज्ञात इसमाने डोक्यावर मारल्याने जीव गेल्याचे दिसत होते. हा खुनाचा प्रकार असल्याचे कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे यांच्या लक्षात आले घटनास्थळी पत्नी व इतर नातेवाईकापेक्षा जास्त रडणारा इसम कोण याची चौकशी करत असताना पोलिसांना चक्क आरोपीच हाती लागला.
चौकशी मध्ये ज्ञानेश्वर आप्पाजी ठोंबरे राहणार सारंगवाडी हा शनिवारी रात्री आखाड्यावर येऊन गेला असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले मयताची पत्नी आणि ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्यात अनैतिक संबंध होते त्यात मयत शिवाजी पोटे अडसर ठरत होता नेहमी ज्ञानेश्वर का येतो असे विचारून संशयावरून आपल्या पत्नीला जाब विचारून धारेवर धरत होता त्यावरून प्रकार उघडकीस येईल या भीतीने संगणमताने शिवाजी पोटे याचा काटा काढण्याचा बेत झाला असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
याप्रकरणी मयताचा मावसा तुकाराम उतम मिरासे रा. गवळेवाडी ता. औंढा त्यांच्या तक्रारीवरून कुरुंदा पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर अप्पाजी ठोंबरे (28) रा सारंगवाडी, ता.औंढा आणि मयताची पत्नी मंगल शिवाजी पोटे (28) रा. गवळेवाडी ता.औंढा या दोघा विरोधात संगणमत करुन कटकारस्थान रचुन आरोपी यांना त्यांच्या अनैतिक संबधात मयतामुळे अडथळा निर्माण होत असल्याने शिवाजी फोटो याच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी करून ठार मारले म्हणुन (Kurunda police Case) गुन्हा नोंदवला आहे.
या (Kurunda police Case) प्रकरणाचा तपास सपोनी रामदास निरदोडे करत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे ,सपोनि रामदास निरदोडे., स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे , पो.उप.नि कारामुंगे सपोउपनि बिचेवार आदींनी भेट दिली. श्वानपथक,ठसे तज्ञ यांच्या पथकाने हे भेट दिली. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सपोनि रामदास निरदोडे,भालेराव, वडकीले , भगीरथ सवंडकर भुरके मुंडे यांच्यासह पोलीस पथकाने यशस्वी कामगिरी बजावली.
जास्त रडणे महागात पडले
यातील दोन्ही आरोपींचे आपसात संबंध होते याचा संशय नवऱ्याला आला होता आरोपी ज्ञानेश्वर हा आखाड्यावर अधून मधून येत असे शनिवारी रात्री तो आला होता त्यादिवशी मध्यरात्रीनंतर मयत शिवाजी पोटे यांच्या डोक्यात काठीने मारून त्याचा जीव घेतला असल्याचे चौकशीचे निष्पन्न झाले आहे सकाळी मृतदेह सापडल्यानंतर मयताची पत्नी रडत होती त्याचप्रमाणे आरोपी ज्ञानेश्वर सुद्धा जोरजोरात रडत होता कोणतेही नाते नसताना हा रडणारा कोण आहे असा संशय सपोनी निरदोडे यांना आला व त्यांनी चाणाक्षपणे ज्ञानेश्वरला चौकशीसाठी बोलावले पोलिसांचे बोलावणे येतात ज्ञानेश्वरने सर्व घटनाक्रम पटापट सांगितला व खून प्रकरणाला वाचा फुटली प्रकरण उघडकीस आणण्यासाठी कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे ,भालेराव ,वडकीले, भगीरथ सवंडकर ,भुरके, मुंडे यांनी परिश्रम घेतले.
