हिंगोली (Kurunda Station Fire ) : कुरूंदा पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीमधून काहीजणांना आग दिसून येताच त्याची माहिती डायल ११२ वर देण्यात आली. तात्काळ पोलिसांनी धावाधाव करून अवघ्या काही मिनिटात ही आग विझविली.
अत्यावश्यक गरजेसाठी पोलिसांनी डायल ११२ सुरू केले आहे. काही ठिकाणी डायल ११२ चा दुरूपयोग झाल्याने त्या अनुषंगाने गुन्हेही दाखल झाले आहेत; परंतु कुरूंदा येथे डायल ११२ वर कुरूंदा पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीला आग लागल्याची माहिती १४ डिसेंबर रोजी रात्री ७.१० च्या सुमारास मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे यांच्यासह बालाजी जोगदंड, गजानन भालेराव यांनी तात्काळ धावाधाव करून घटनास्थळी गेले. जुन्या इमारतीमध्ये लहान प्रमाणात आग दिसून येताच त्यावर पाण्याचा मारा करून ही (Kurunda Station Fire) आग विझविण्यात आली. आग विझल्याने उपस्थितानी सुटकेचा निश्वास सोडला. विशेष म्हणजे कुरूंदा ठाण्याला मागील काही वर्षापूर्वी नवीन इमारत मिळाली असल्याने ही जुन्या ठाण्याची इमारत पडीत अवस्थेत आहे.