वाशिम (MLA Bachu Kadu) : शेती लागवडीचा वाढता खर्च कमी होण्यासाठी तसेच रासायनिक खतांच्या अतिवापराने खराब होत चाललेली शेतजमीन चांगली राहण्यासाठी बांधावरच प्रयोगशाळा असणे आजच्या काळाची गरज झाली आहे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांनी केले. जिल्ह्यातील एरंडा येथे फार्मलॅब एरंडा अॅग्री सोल्युशन प्रोड्युसर कंपनीच्या शेतात बांधावरील प्रयोगशाळा व ट्रेनिंग सेंटरला (Training Center) दिलेल्या भेटप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करताना पुढे ते (MLA Bachu Kadu) म्हणाले, की बांधावरच्या प्रयोगशाळा गावोगावी व्हाव्या. त्यासाठी मी मदत करणार. बांधावरच्या प्रयोगशाळेत जी खतं, औषध बनतात, ती शेतीसाठी उपयोगी आहेत. शेतकर्यांना ती कमी दरात मिळतील. त्यामुळे शेतकर्यांनाही ते परवडणारे राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर शंकरराव तोटावर यांनीही बांधावरच्या प्रयोगशाळाविषयी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. तर डॉ. संतोष चव्हाण यांनी निर्माण केलेल्या फार्मुल्याचे आ. बच्चू कडू MLA Bachu Kadu) यांनी कौतुक करून गावकरी मंडळीचे आभार व्यक्त केले. यावेळी फार्मलॅबचे संचालक डॉ. संतोष चव्हाण, दीपक घुगे, विजय घुगे, मनोहर सांगळे, सतीश कुरकुटे, सरपंच सुरेशराव घुगे, नवनाथराव घुगे, उपसरपंच वसंतराव सांगळे, राजेश सांगळे, गजानन गीते, संतोष घुगे, विठ्ठल घुगे, गजानन शेषराव घुगे, वामनराव घुगे, प्रकाश महाराज, विजयराव घुगे, नाजूकराव घुगे, विलासराव सांगळे, निलेश घुगे, शिवदास भेंडेकर, शिवराज कुरकुटे, गोवर्धन घुगे आदींची उपस्थिती होती.




