Parbhani :- परभणी तालुक्यातील दैठणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला आहे. शुक्रवार २ मे रोजी काही नागरीक तपासणीसाठी गेले होते. त्यावेळी वैद्यकीय अधिकार्यांनी बीपी यंत्र (BP Machine) खराब असल्याचे सांगितले. या प्रकारामुळे प्रा.आ.केंद्रात आलेल्या रुग्णांना रिकाम्या हाती परत जावे लागले.
रुग्ण घरी जात असताना यांना बीपीचा त्रास होत होता, त्यामुळे येथील काही रुग्णांनी खाजगी रुग्णालयामध्ये जाऊन तपासणी केली
परभणी तालुक्यातील दैठणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शुक्रवार रोजी काही नागरिक आपल्या आरोग्याच्या समस्या तपासण्यासाठी गेले होते. त्यावेळी वैद्यकीय अधिकार्यांनी या रुग्णांची तपासणी करत असताना तुमचा बीपी व्यवस्थित असल्याचे सांगून तपासणी झाले असे दाखवून घरी जाण्यास असे सांगितले. रुग्ण घरी जात असताना यांना बीपीचा त्रास होत होता, त्यामुळे येथील काही रुग्णांनी खाजगी रुग्णालयामध्ये जाऊन तपासणी केली असता त्यांचा रक्तदाब वाढलेला दिसून आला. याबाबत काही युवकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून वैद्यकीय अधिकार्यांशी याविषयी विचारणा केली असता वैद्यकीय अधिकार्यांनी बीपी तपासणी यंत्र खराब झाल्याचे सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दोन बीपीयंत्र बंद अवस्थेत आढळून आले तर एक बीपीयंत्र दुसर्या डॉक्टरने (Doctor) घरी नेल्याचे इतर कर्मचार्यातून सांगण्यात आले. यामुळे दैठणा प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले.