पुसद(Pusad):- पुसदच्या एमआयडीसी परिसरात अजूनपर्यंत मोठे उद्योग, कारखाने आले नसल्यामुळे औद्योगिक वसाहती मधील अनेक मूखंड रिकामेच धुळखात पडलेले दिसत आहेत तर अनेक इमारती या भंगार अवस्थेत गेल्या असून अनेक इमारतींना तडे गेले आहेत. १९९३ यावर्षी पुसद या औद्योगिक वसाहतीची स्थापना झाली. याला 30 वर्षाचा कालावधी लोटला. तरीही परिसरात एमआयडीसी चे स्थानिक कार्यालय सुद्धा उपलब्ध नसल्यामुळे सर्व कारभार यवतमाळच्या कार्यालयातूनच होत असल्याचे दिसून पडत आहे.कोणत्याही गावाचा विकास व्हायला त्या त्या गावातील औद्योगिक वसाहतींचा मोठा हातभार असतो. पुसदच्या औद्योगिक वसाहतीला अनेक वर्ष झालीत तरीही या ठिधणी अजून पर्यंत कोणतेही मोठे उद्योग कारखाने रोजगार उपलब्ध करून देईल असा एखादा चांगल्या कंपनीचे युनिट आलेच नाही. सध्या स्थितीत एमआयडीसीमध्ये केवड बोटावर मोजण्याइतके स्थानिक युनिट सुरू आहेत. त्यामध्ये अमृतधारा डेअरी प्रोडक्ट युनिट, विजय ऍग्रो जिनिंग युनिट, वसंत बायोटेक कृषी युनिट, छोटे मोठे किरकोळ कारखाने इत्यादी महावितरणला लोखंडी पोल पुरविणारी खाजगी युनिट, ट्रॅक्टरचे पार्टस निर्मिती करणारी युनिट, पेवर ब्लॉक व पुठ्याचे उद्योगांचे युनिट कारखाने या औद्योगिक परिसरातील भूखंडांवर असून अजूनही मोठ्या उद्योग कारखान्यांची प्रतीक्षा या औद्योगिक वसाहतीला आहे.
औद्योगिक वसाहतीला मोठा फटका
सध्या स्थितीत औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या या ४० उद्योगांमधून किमान प्रायक्ष आय १००० लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. पुसद परिसरात दळणवळणाची साधने अपूरीआहेत. या कारणांमुळे कदाचित या औद्योगिक वसाहतीच्या विकासाला चा पेच निर्माण झालेला असावा तालुक्याची लोकसंख्या चार लाखाच्या जवळ गेली आहे तर सर्वात जास्त ६० टक्के ग्रामीण जनता कामधंद्यानिमित्त कुटुंबासह स्थलांतर करणारे परिवार आहेत. या भागात रेल्वे नसल्यामुळे याचा मोठा फटका औद्योगिक वसाहती ला बसला असून पर्यायाने पुसद तालुक्याच्या विकासाला मोठा फटका बसल्याचे दिसते. वास्तविकता पुसद तालुक्याची राजकीय पार्श्वभूमी अतिशय मोठीच राज्याला दोन मुख्यमंत्री देणारा तालुका सातत्याने कंविनेट मंत्रीपद मिळणारा तालुका तर आजच्या घडीला तीन आमदार व एक खासदार असलेला तालुका तरीही गेल्या अनेक वर्षांपासून तालुका हा विकासापासून कोसो दूर असल्याचे दिसून येत आहे. ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्र असते कोकण असो खानदेश असो वा मुंबई या भागांचा विकास मोठ्या झपाट्याने झाला. त्या ठिकाणच्या राजकीय नेत्यांनी करून घेतला मात्र पुसद तालुक्यातील राजकीय नेत्यांची अनास्था येथील विकासाला नडल्याचे दिसत आहे.
सहकार क्षेत्रातून उभारलेल्या सहकारी कारखाने जिनिंग प्रेसिंग मधून सोन्याचा धूर निघत असे
तालुक्यातील एकेकाळी सहकार क्षेत्रातून उभारलेल्या सहकारी कारखाने जिनिंग प्रेसिंग मधून सोन्याचा धूर निघत असे. कालांतराने मात्र सर्व सहकारी उद्योगचंदे व काररखाने जिनिंग प्रेसिंग स्थानिक नेत्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे, पुसदच्या औद्योगिक वसाहतीचा बट्ट्याबोळ झालेला दिसत आहे. औद्योगिक वसाहतीचा सर्वांगीण विकास सर्व स्थानिक नेत्यांनी तो झाल्याशिवाय राहणार नाही. आज पुसद तालुक्याची वाटचाल जिल्ह्याच्या दिशेने सुरू आहे. सत्ताधारी पक्षांमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये पुसद विधानसभेचे(Legislative Assembly) आमदार इंद्रनील नाईक व भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद आमदार एड. निलय नाईक तर तर खासदार म्हणून येथे चार जून रोजी कोण प्रतिनिधित्व करेल हे निश्चित होणार आहे. या सर्वांनी मिळून पुसद औद्योगिक वसाहतीचा विकास करणे गरजेचे आहे. पुसदचे लोकनेते माजी मंत्री मनोहर नाईक यांनी आता तरी गांभीर्याने पुसदच्या विकासाचा ध्यास शेवटच्या टप्प्यात घेणे गरजेचे आहे. ज्याने कालांतराने अनंत काळापर्यंत त्यांचं नाव अजरामर होईल. अशी भावना पुसद तालुक्यातील बेरोजगारांची आहे.