लातूर(Latur) :- राज्यात नावलौकिक असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी(Chief Minister Majhi Ladaki Baheen Yojana) लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महिलांसाठी विशेष बाब म्हणून शून्य बॅलन्सवर(zero balance) खाते उघडण्याची घोषणा केली. बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांनी ही घोषणा केली.
चेअरमन आमदार धीरज देशमुख यांची घोषणा
लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन (Chairman) आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी या योजनेसाठी ग्रामीण भागातील महिला वर्गाना कुठल्याच सुविधा इतर बँकेकडून उपलब्ध नसल्याचे लक्षात आल्याने यासाठी त्यांनी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची विशेष बैठक घेऊन त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने साठी जिल्हा बँकेकडून शुन्य बॅलन्स ने खाते उघडून देण्याचा निर्णय घेतला. यामुळें जिल्ह्यातील लाखो महिलांना याचा फायदा होणार आहे. तसेच जिल्हा बँकेचे ग्रामीण भागातील प्रत्येक गावात शाखा व सुविधा बँकेकडून उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील महिला वर्गाला इतर बँकेत दुसऱ्या गावाला जाण्याचा येण्याचा खर्च व वेळ वाचणार आहे. जिल्हा बँकेच्या या निर्णयामुळे जिल्ह्यांतील महिला वर्गाकडून कौतुक (appreciation) होत आहे.