मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावी अंमलबजावणीसाठी सेनगावात महिला मेळावा संपन्न
सेनगाव (CM Majhi Ladki Bahin Yojana) : राज्य सरकारकडून नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात महिलासाठी अतिशय कल्याणकारी ठरणारी योजना (CM Majhi Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही असून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी भारतीय जनता पार्टी कडून आठ जुलै रोजी महिलांसाठी मार्गदर्शन महिला मेळाव्यांचे आयोजन ही के देशमुख मंगल कार्यालयात करण्यात आले होते माहे जुलै महिन्या पासून महायुतीचे सरकार लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे पडणार हा महायुती सरकारचा वादा असल्याची ग्वाही प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ (Chitra Wagh) यांनी दिली.
भारतीय जनता पार्टीकडून सेनगाव शहरात हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात महिला मेळाव्याचे आयोजन आठ जुलै रोजी करण्यात आले होते.या महिला मेळाव्या दरम्यान प्रमुख मार्गदर्शन भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी चित्राताई वाघ (Chitra Wagh) यांनी आपल्या मार्गदर्शनात केंद्र व राज्य सरकारकडून महिलांसाठी प्रचंड कल्याणकारी योजना अमलात असून या योजनेचा प्रत्येक भारतीय महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ (Chitra Wagh) यांनी उपस्थित महिला वर्गांना केले. केंद्र शासनाने महिलांसाठी उज्वला मोफत गॅस व नुकताच राज्य सरकारने महिलांसाठी जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (CM Majhi Ladki Bahin Yojana) व प्रति वर्षाला अन्नदान योजनेअंतर्गत तीन गॅस मोफत देण्याची योजना यासह संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना यासह इतर असणार्या महिलांसाठी कल्याणकारी योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा व मोदी सरकारने देशातील महिलासह इतर कुटुंबांना मोफत धान्याचा लाभ दिला तर नवर्याच्या पतीवर पत्नीचाही कायम हक्क राहणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून आता महिलांनी अन्याय अत्याचाराच्या बळी पडू नये त्यांनी कृतृत्ववान व स्वाभिमानी जीवन जगून निर्भीडपणा जपला पाहिजे तरच महिलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे.
यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (CM Majhi Ladki Bahin Yojana) या योजनेसाठी लागणार्या कागदपत्रांमध्ये राज्य सरकारने फार मोठी शितलता आणून राज्यात प्रत्येक बहिणीला आपल्या महायुतीतील तीन भाऊ म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्याकडून हक्काची भाऊबीज प्रतिमाह मिळणार मिळणार असून हा महायुती सरकारचा वादा आहे अशी ग्वाही चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी दिली तर आता दाखले व इतर कागदपत्रे काढण्यासाठी तहसीलकडे जाण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच हिंगोली विधानसभेचे आ. तानाजी मुटकुळे यांनी आपल्या भाषणात हिंगोली जिल्हा हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा असून या जिल्ह्यात खास करून सेनगाव शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ व्हावा यासाठी महिला मेळाव्याचे आयोजन करणारा हा महाराष्ट्रातील प्रथम जिल्हा आहे.
त्यामुळे या जिल्ह्यातील कोणतीही महिला शासकीय योजनेपासून वंचित राहू नये या योजनेचा जिल्ह्यातील गरजवंत महिला व (CM Majhi Ladki Bahin Yojana) बहीण भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन आ. तानाजी मुटकुळे यांनी केले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या जिंतूर, सेलू विधान सभेच्या आ. मेघनाताई बोर्डीकर हिंगोली विधानसभेचे आ. तानाजी मुटकुळे, माजी खा. शिवाजी माने, माजी आ. रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर,भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा उज्वलाताई तांभोळे, भाजपा नेते रामदास पाटील सुमठाणकर, सभापती अशोक ठेंगल, संतोष टेकाळे, भाजपा युवा मोर्चा शिवाजीराव मुटकुळे, भाजपा ज्येष्ठ नेते माजी सभापती आप्पासाहेब देशमुख, तालुकाध्यक्ष हिम्मत राठोड, भाजपा युवा नेते विजय धाकतोडे पाटील, शंकर बोरुडे, कांतराव कोटकर, विठ्ठल घोगरे, गटनेते अमोल तिडके, सतीश खाडे, कैलास खाडे, श्रीरंग राठोड यासह भाजपा पदाधिकार्यांची उपस्थिती होती. या भारतीय जनता पार्टी आयोजित महिला मेळाव्यात महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या मेळाव्या दरम्यान उपस्थित महिलांना व्ही.के.देशमुख मंगल कार्यालय बसण्यासाठी अपुरे पडल्याने काही महिला भगिनींना बाहेर बसूनच कार्यक्रमाचा लाभ घ्यावा लागला तर या कार्यक्रमासाठी ग्रामीण भागासह शहरातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.