आपली अब्रू वाचविण्यासाठी राज्य सरकारचा आटापिता; काँग्रेसचा पत्र परिषदेत आरोप
अर्जुनी मोर (Ladki Bahin Yojana) : लोकसभेमध्ये हार खाल्ल्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणूक आपली अब्रू झाकण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला नव्या नव्या योजनाची आमीष दाखवून भूलभुलया देण्याची केविलवाणा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. आमचा (Ladki Bahin Yojana) लाडकी बहीण योजनेला विरोध नाही मात्र मागील तीन ते चार महिन्यापासून विविध योजनेतील अनुदान व जनतेचे हक्काचे पैसे राज्य सरकारने थकवले त्यामुळे ताबडतोब लाभार्थ्यांना अनुदान व मजुरांची मजुरी राज्यातील जनतेच्या खात्यात जमा करा आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आला स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव येथे दिनांक 09 ऑगस्ट रोजी पत्र परिषद आयोजित करण्यात आली. पत्र परिषदेला जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड, प्रदेश प्रतिनिधी राजू पालीवाल, जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे, तालुका अध्यक्ष घनश्याम धामण, नगरसेवक अतुल बनसोड ,इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष व प्रदेश प्रतिनिधीच्या वक्तव्याने काँग्रेस उमेदवारांमध्ये खडबड
सध्या भाजपमधील असलेल्या माजी जिल्हा परीषदसदस्य किरण कांबळे यांनी पक्षाचे कुठलेही सदस्यत्व न स्वीकारता काँग्रेस पक्षातून उमेदवारी करता अर्ज पक्षश्रेष्ठीकडे केल्याची चर्चा नागरिकात सुरू आहे याबाबत (Congress Paper Conference) पत्र परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड व महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी राजू पालीवाल यांनी काँग्रेस पक्षाचे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे उमेदवारी करिता खुले आव्हान करत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात उमेदवारी करिता आधी आवेदन मागितला आहे. त्यामुळे तो आपल्या पक्षाचा आहे की दुसऱ्या पक्षाचा आहे तो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे किंवा नाही याच्याशी देणं घेणं नाही ते तिकीट देत असताना समिती बघेल असे विधान काँग्रेसमध्ये प्रमाणिकपणा करून पक्षासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या निष्ठावंत संभाव्य उमेदवार कार्यकर्त्यांची पण वेळेवर आयात होणाऱ्या या व नेहमी बंडखोरी करणारे अशा सर्वांनी आतापासूनच एकाच पारड्यात मोजणी होत असल्यामुळे निष्ठावंतांची मन दुखावून त्याची व नाराजी पसरल्याची चर्चा कालपासून आपल्या पक्षाचा आहे.
काय सांगता ….प्रचार राष्ट्रवादीचा तिकीट मागतात काँग्रेसला
बंडोकर किरण कांबळे यांचा विषय चर्चेत असताना गडचिरोली येथे रहिवासी असलेल्या कार्यकर्त्या या प्रचार करतात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा व त्यांनी अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या गोट्यातून उमेदवारी करिता नामांकन दिल्याची माहिती यत आहे त्यामुळे प्रचार राष्ट्रवादीचा आणि तिकीट मागतात काँग्रेसला आणि ते आवेदन काँग्रेस कडून स्वीकारल्या जात असल्याने काँग्रेस कार्यकर्ते तथा नागरिकांमध्ये काँग्रेस पक्ष स्वतःहून पक्षात चिखल करत असल्याची भावना निष्ठावंत कार्यकर्ते तसेच नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. विशेष म्हणजे त्यांचा बॅनर स्थानिक स्टेट बँक झळकत असल्याची दिसून येते आहे.