देसाईगंज येथे कांग्रेसचे मसराम यांचे नामांकन दाखल
कोरेगाव, चोप/गडचिरोली (Vijay Vadettiwar) : लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) यूती शाशनाने सूरू केली व यूती शाशन जाताच ही योजणा बंद पडेल, अशा वावड्या महायूतीचे नेते उडवत महिला भगीनीची दिशाभूल करीत आहेत. मात्र महागाई दिड पटीने वाढलेली असताना १५०० रुपयात महिला भगीनींचा सन्मान राखणे शक्य होणार नाही म्हणून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच योजनेचा निधीत भरीव वाढ करीत २५०० रूपये प्रति महिणा करण्यात येईल अशी गवाही राज्य विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजयभाऊ वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यानी दिली.
आज दूपारी १ वाजता महाविकास आघाडीचा वतीने आरमोरी विधानसभा क्षेत्रात कांग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रामदास मसराम यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यात आला तत्पूर्वी येथील कूरखेडा मार्गावर असलेल्या पटांगणावर आयोजित सभेत मार्गदर्शन करताना विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) बोलत होते. सभेनंतर लगेच हजारोंचा संख्येत उपस्थीत समर्थक महाविकास आघाडीचा पदाधिकारी व कार्यकर्ता सह पारंपरिक आदिवासी रॅला नृत्य,डि जे तालात वाजत गाजत सजवलेल्या रथात व बैलबंडीत स्वार होत मूख्य बाजारपेठेतून मिरवणूक उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहचली येथे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मानसी यांचाकडे रामदास मसराम यानी नामांकन अर्ज दाखल केला.
याप्रसंगी विधान परिषद सदस्य आमदार सूधाकर अडबाले कांग्रेस जिलाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी ज्येष्ठ नेते गणी शेख, कम्युनिस्ट पक्षाचे अमोल मारकवार सपाचे जिल्हाध्यक्ष इलियास खान, रविन्द्र दरेकर, जयंत पाटिल हरडे कांग्रेस कूरखेडा तालुका अध्यक्ष जिवन पाटील नाट देसाईगंज तालूका अध्यक्ष राजेंद्र बूल्ले कोरची येथे तालूका अध्यक्ष मनोज अग्रवाल आरमोरी तालुका अध्यक्ष मिलींद खोबरागड़े,माजी प स सभापती परसराम टिकले, उपसभापति नितीन राऊत,जावेद शेख,माजी जि प सदस्य नंदू नरोटे,माजी प स सभापती गिरीधर तितराम माजी जि प सदस्य पि आर आकरे माजी नगरसेवक आरिफ खाणानी पिरीपाचे प्रमोद सरदारे, संतोष खोबरागड़े,माजी नगराध्यक्ष आशाताई तूलावी यांचा सह मोठ्या संख्येत कांग्रेस व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थीत होते.