लाडला भाऊ योजनेअंतर्गत 120 ग्रामपंचायतमध्ये पात्र उमेदवाराला 6000 रुपये पेमेंटवर कंत्राटी नोकरी 6 महिन्यासाठी
पुसद (Ladla Bhau Yojana) : महायुती सरकारचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून लोकप्रिय ठरलेली “लाडली बहीण योजना ” पात्र महिलांना या योजनेअंतर्गत दर महिन्याला पंधराशे रुपये तर रक्षाबंधनाच्या पर्वावर अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषित केल्याप्रमाणे प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये वळते करण्यात येणार आहेत. अशीच दुसरी लोकप्रिय योजना (Ladla Bhau Yojana) या सरकारने बेरोजगार युवकांसाठी निर्माण केली.
दहावी-बारावी ग्रॅज्युएशन व डिग्री प्राप्त तरुणांसाठी सहा हजार रुपये आठ हजार रुपये बारा हजार रुपये अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ” स्टायपॅड ” अर्थात सहा महिने नोकरी अशी योजना जाहीर केली. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले तर. दि. 12 ऑगस्ट रोजी (Pusad Panchayat Samiti) पुसद पंचायत समिती करिता केवळ एका दिवसासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची वेळ ठरविण्यात आली. विशेष करून पुसद तालुक्यातील 120 ग्रामपंचायतीच्या डेटा ऑपरेटर यांना ग्रामसेवकांकडून 11 ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले. तर संबंधित सरपंचांना ग्रामसेवकांनी 12 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत फोन केले.
शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या योजना राबविण्याच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत त्रुटी निर्माण झाल्यामुळे हयगय हलगर्जीपणा यासोबत कामचुकारपणा दिसून आला. मात्र या सर्व गोंधळामध्ये सर्वसामान्य बेरोजगार युवकांना व त्यांच्या नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला शासनाने योजना राबवित असताना इनडायरेक्टली एक तर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे वळते करावेत. व त्यांची एक विशिष्ट ओळख, कागदपत्रांची खातरजमा करून घ्यावी. मात्र तसे होताना दिसत नाही. महायुती सरकार तर्फे केवळ सवंग प्रसिद्धी व नागरिकांचे मन जिंकण्याचे अयशस्वी प्रयत्न सुरू असल्याचे याच्याहून उघड होत आहे. यामुळे मात्र पात्र असणाऱ्या व कर भरणाऱ्या प्रत्येक समाजातील नागरिकांवर अन्याय होत आहे एवढे निश्चित.