औंढा नागनाथ (Shri Sarangaswamy Yatra) : तालुक्यातील सारंगवाडी येथील श्री सारंगस्वामी यात्रेतील प्रसिद्ध भाजी महाप्रसादाचा दिनांक १६ जानेवारी शुक्रवार रोजी दीड लाखाच्या वर भाविकांनी लाभ घेतला भल्या पहाटेपासूनच रांगेत उभे राहून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी पोलिसांचा सर्वत्र मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी येथील डोंगरावर वीरशैव समाज बांधवांचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ सारंगस्वामी महाराज (Shri Sarangaswamy Yatra) यांचे समाधीस्थळ आहे दरवर्षी मकर संक्रांति निमित्त येथे मोठी यात्रा भरते ही यात्रा तीन-चार दिवस राहते यानिमित्त लाखो भाविक येऊन श्री सारंगस्वामीचे दर्शन घेतात दरम्यान या यात्रेतील प्रमुख आकर्षण बारा मिसळची भाजी ज्यामध्ये मेथी,गोभी, गाजर, आलू, टमाटे, कद्दू, वांगे, दोडके, वालाच्या शेंगा, पालक, मिरची सह बनवलेली बारा मिसळची १४५ भाजी १६ जानेवारी रोजी वाटप करण्यात आली.

तत्पूर्वी मठाधिपती १०८ प्रभूलिंग शिवाचार्य महाराज, शिवाचार्य नंदकिशोर महाराज पूर्णा, थोरला मठाचे मंतया स्वामी, पोलीस निरीक्षक जीएस राहिरे, उज्वलाताई तांभाळे यांच्या हस्ते भाजीची पूजा करून वाटपास सुरुवात करण्यात आली. हा (Shri Sarangaswamy Yatra) भाजी महाप्रसाद खाल्ल्याने वर्षभर रोगराई होत नाही अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे. त्यामुळे या भाजीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक,आंध्र प्रदेश, तेलंगाना या राज्यातून भाविक दाखल झाले होते. जवळपास १४५ क्विंटल भाजीचा महाप्रसाद वाटप झाला. या भाजीसोबत पोळी असावी. यासाठी वसमत येथील उज्वलाताई तांभाळे ह्या मागील १९ वर्षापासून भाविकांना भाजी सोबत खाण्यासाठी पोळी वाटप करतात यावर्षीही १२ क्विंटल पोळ्या वाटप करण्यात आल्या.

तसेच १५ जानेवारी रोजी सायंकाळी प्रभुलिंग महाराज यांच्या उपस्थितीत श्री सारंगस्वामी महाराजांची (Shri Sarangaswamy Yatra) पालखी मिरवणूक व दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने भावीक भक्तांची उपस्थिती होती. भाजी महाप्रसादासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याने पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जीएस राहिरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस,यशवंत गूरूपवर, अमोल इंगोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाब थिटे, दिलीप नाईक, रमेश मस्के, माधव सूर्यवंशी, तानाजी ढाकरे, सुभाष जयताडे,शेरखा पठाण, वसंत चव्हाण, विलास पाईकराव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.





