मृतक कर्हांडला येथील
लाखांदूर-वडसा रोडवरील सावंगी जवळील घटना
मासळ (Lakhandur Accident) : लाखांदूर-वडसा रोडवर सावंगी गावाजवळ दि.२२ एप्रिल रोजी दुपारी ११.२० वाजतादरम्यान वडसाकडे जात असलेल्या दुचाकीस्वाराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. (Lakhandur Accident) दुचाकीस्वार मृतकाचे नाव योगेश ज्ञानेश्वर पारधी (३३) रा.कर्हांडला ता.लाखांदूर जि.भंडारा येथील रहीवासी आहे.
सदर घटनेच्या एका दिवसाआधी मृतकाने पत्नीसी भांडण करुन मारहाण केल्याने त्यांची सासुरवाडी असलेले कोंडाळा (देसाईगंज/वडसा) येथील मुलीचे वडील व इतर मंडळी यांनी मृतकाच्या पत्नीला कोंडाळा येथे नेल्याचे माहित होताच योगेश दि.२२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कोंडाळा येथे स्वमालकीचे गाडी क्र.एम.एच. ३६ डी ६२४० या दुचाकीने जात असतांना (Lakhandur Accident) लाखांदूर-वडसा रोडवरील सावंगी गावासमोर अज्ञात वाहनाने जबर धडक दिली असून दुचाकीस्वाराच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला व रोडच्या मध्यभागी पडला. त्यांच्या शरीरातून भरपूर रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती रस्त्याने जात असणार्या प्रवाश्यांनी वडसा पोलीस प्रशासनाला दिली असून पोलीस प्रशासनाने घटनेचा पंचनामा व अज्ञात वाहन व चालकाविरोधात गुन्ह्याची नोंद घेतली असून (Lakhandur Accident) मृतकाचे शव शवविच्छेदनाकरीता वडसा येथील शवागृहात पाठविण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे. योगेशचे मृत्यूपश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुले आहेत.




