तीन वर्षांआधीपासून नवीन इमारत बांधकाम सुरू मात्र प्रतीक्षा कायम
लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करण्याची होत आहे मागणी
लाखांदूर (Lakhandur Panchayat Samiti) : हल्ली लाखांदूर पंचायत समितीचा कारभार छोट्या-छोट्या जुन्या पाच-सहा इमारतीमधून सुरु असून सर्व इमारतींना गळती लागलेली व सदर इमारतीत ये-जा ही जमीन शेवाळलेल्या गुडघ्याभर पाण्यातून त्रासदायक व अपघातात्मक करावा लागत असता नवीन इमारतीचे बांधकाम लवकर करुन कार्यालयीन कामकाज स्थलांतरणाची मागणी सर्वांकडून होत आहे.
लाखांदूर पंचायत समितीची (Lakhandur Panchayat Samiti) कार्यालयीन इमारत फार जुनी आहे. त्या इमारतीतून कारभार चालविता अनेक समस्यांना भेडसावित असताना ती इमारत निर्लेखीत करण्यात येऊन नवीन इमारत बांधकामास मंजुरी व निधी उपलब्ध झाल्यानंतर मागील तीन वर्षाचे आधीपासून नवीन इमारतीचे बांधकाम अधिक धिम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे तालुक्यातील जनता बांधकामावर प्रश्न चिन्ह उपस्थित करीत असून जनता नवीन इमारतीचे प्रतिक्षेत आहे.
तर इकडे जुन्या निरलेखीत इमारतीला पाडून तेथील कामकाज हटवून परिसरातीलच छोट्या-छोट्या जुन्या इमारतीमधून हल्ली सुरु असता इमारतींना लागलेल्या पावसाचे पाण्याच्या गळतीने पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी यांना खुर्चीवर बसणे कठीण झाले आहे. मात्र विविध योजनांची उपयोगी कागदपत्रे, आवश्यक दस्तावेज व कॉम्प्युटर तथा इतर उपयोगी साहीत्य पाण्याने भिजण्यापासून वाचविण्यासाठी त्रासदायक कसरत करावी लागत आहे.
सोबतच सदर कार्यालयीन इमारतीचे प्रवेश द्वारावर शेवाळलेल्या जाणी गुडघाभर पाणी साचत आहे. तर परिसराला डबक्याचे स्वरुप आले आहे. त्यामुळे येणे जाणे कठीण व अपघातास्पद झाले असून बरेच जण घसरुन पडलेले ही आहेत. करीता ह्या त्रास व धोकादायक इमारतातून तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतच्या विकास कामाचा कारभार चालत असुन रोजच शेकडो जनतेची कामाकरीता वर्दळ मात्र अशा समस्यांमुळे दप्तर दिरंगाई होत आहे.
करीता सदर पंचायत समितीच्या (Lakhandur Panchayat Samiti) एकूण कामकाजाची व समस्यांची दखल घेता नवीन इमारतीचे सुरू असलेले बांधकाम संबंधित विभागाने लवकरात लवकर करुन पूर्ण करुन कार्यालयीन कामकाजाकरीता हस्तांतरीत करावी अशी मागणी पंचायत समिती पदाधिकारी-अधिकारी तथा जनतेकडून होत आहे.
प्रतिक्रिया:
आमच्या पंचायत समितीचा कारभार हल्ली जुन्या छोट्या-छोट्या इमारतीमधून सुरु असून पावसाचे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने आमच्यासह अधिकार्यांचे खुर्चीवर बसणे कठीण होत तर आहे, परंतु कार्यालयीन उपयोगी दस्तावेज व साहीत्य सांभाळणे कठीण झाले आहे. सोबतच इमारतींच्या प्रवेशद्वारांवर पाणी साचून असता पाण्यातून ये-जा व जमीन शेवाळल्याने कामाकरीता आलेली जनता, आम्हापैकी काही जण घसरुन पडत आहेत. करीता सदर समस्यांची संबंधीत शासन प्रशासन व बांधकाम विभागाने दखल घेवून लवकर नवीन इमारत कामकाजाकरीता उपलब्ध करुन द्यावी. – पुरुषोत्तम ठाकरे सभापती, पं.स.लाखांदूर