लाखांदूर महामार्गवरील घटना
बारव्हा (Lakhandur Police) : लाखांदूर पोलीस स्टेशन मधून आपले शासकीय कामे आटोपून घराकडे परत जात असलेल्या पोलीस शिपाई यांची दुचाकी स्लिप होवून जागीच मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर येथील राष्ट्रीय महामार्गवरील असलेल्या किशोर कपडा दुकानाजवळ घडली. सदर घटना दि 6 जुलै रोजी रात्री 11:30 वाजताच्या दरम्यान घडली आहे. अनिल नामदेवराव राठोड वय 37 वर्ष असे पोलीस शिपाई यांचे नाव आहे. अनिल राठोड यांचे मूळगाव कारपा तालुका मानोरा जिल्हा वाशीम येथील रहिवासी असून ते मागील तीन वर्षांपासून (Lakhandur Police Station) लाखांदूर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई या पदावर कार्यरत होते.
प्राप्त माहितीनुसार अनिल राठोड हे (Lakhandur Police Station) पोलीस ठाण्यातून आपले शासकीय कामे आटोपून रात्री 11:30 वाजताच्या दरम्यान आपल्या दुचाकीने रूमवर जाण्यासाठी निघाले असता किशोर कपडा दुकानासमोर साचलेल्या चिखलावरून दुचाकी स्लिप झाल्याने समोरून जात असलेल्या सायकल चालकास मागेहून धडक देऊन ते रस्त्यावर पडल्याने गंभीररित्या जखमी झाले. सायकल चालक हे (Lakhandur Taluka) लाखांदूर येथील एका बिअर बार मध्ये कर्मचारी असून बिअर बारचे काम आटोपून घरी जात होते. अशी माहिती मिळाली आहे.
घटनास्थळावरून जात असलेल्या काही नागरिकांना हे लक्षात येताच याची माहिती (Lakhandur Police) लाखांदूर पोलिसांना दिली. घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आपल्या वाहनाने अनिल राठोड यांना लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. असता उपचाराअंति वैद्यकीय अधिकारी दत्तात्रय ठाकरे यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेतील जखमी दिनेश कोटरंगे वय 37 वर्ष असे सायकल चालकाचे नाव असून तो किरकोळ जखमी झाला आहे. मृत पोलीस शिपाई यांच्या मागे पत्नी व एक मुलगा आहे. या घटनेचा पुढील तपास (Lakhandur Police) लाखांदूर पोलीस करीत आहेत.
चिखलाने केला पोलीस शिपायाचा घात
सद्या पाऊसाचे दिवस सुरु असून शेती कामे जोरात सुरु आहेत. अशावेळी शेतात काम करणारे ट्रॅक्टर यांच्या चाकांना लागलेला चिखलासह मुख्य रस्त्यावरून तसेच धावत असल्याने ग्रामीण भागातील रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरलेले असल्याचे दिसून येत आहे. या चिखलमय रस्त्यावरून दुचाकी चालवीताना अनेकदा मोटार सायकल स्लिप होवून जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. सदर घटनेत राष्ट्रीय महामार्गवर शेतातील चिखल पडला असल्याने या रस्त्यावरून जात असलेल्या (Lakhandur Police) पोलीस शिपाई राठोड यांची दुचाकी स्लिप होवून पुढे सायकल स्वारला आपटून त्यात त्याचा घात झाला. यापूर्वी ठाणेदार सचिन पवार यांनी चिखलाने माखलेले ट्रॅक्टर रस्त्यावरून नेल्यास सक्त कार्यवाही करण्याची ताकीद दिली होती. मात्र ट्रॅक्टर चालक मालक यांनी या आव्हनाकडे दुर्लक्ष करून आजही खुलेआम ट्रॅक्टर रस्त्यावरून धावताना दिसून येत आहेत.