लाखनी (lakhani Fire) : गावालगतच्या मोकळ्या शेतात वैरणासाठी ठेवलेल्या तनसीच्या ढीगाऱ्यांन अचानक लागलेल्या (lakhani Fire) आगीत तनसीचे 11 ढीग जळून खाक झाल्याची घटना घडली. सदर घटना दुपारी ४: ३० वाजताच्या सुमारास लाखनी तालुक्यातील केसलवाडा/वाघ येथे घडली. केसलवाडा/वाघ ते अड्याळ मार्गावर गावालगत रिकामे शेत आहे. या ठिकाणी गावातीलच पशुपालक ओमशंकर चेटुले, संजय दखणे, गणेश वाघाये, वासुदेव चेटुले, भाऊदास ढेंगे, ओमशांकर वाघाये, दिपक दखणे, संदिप दखणे, शंकर ढेंगे आदीचे तनस ढीग ठेवलेले होते. (Bhandara farmar) घटनेच्या दिवसी दुपारी अचानक या धिगांना आग लागली. बघता बघता आगीने रुद्र रूप धारण केले.
शासनाकडे मदतीची मागणी
दरम्यान, गावातील सरपंच स्वप्नील बोरकर हे तत्काळ घटनास्थळी पोहचले आणि लाखनी येथील (fire brigade) अग्निशमन दलाची गाडी बोलाविली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली खरी मात्र, आग आटोक्यात आनेपर्यंत सर्व 11 ही तनासीच्या धिगर्यांची राखरांगोळी झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. विशेष म्हणजे आग वेळीच आटोक्यात आल्याने शेजारील घरापर्यंत आग पोहचू शकली नाही. या घटनेत पशुपालकांचे अंदाजे १लाख रुपयांचे नुकसान झाले असून जनावरांच्या वैरणाचा गंभीर प्रश्न पशुपालकांपुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे, नुकसानग्रस्त (Bhandara farmar) शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी. अशी मागणी येथील सरपंच स्वप्नील बोरकर यांनी केली आहे.