हिंगोली (Hingoli):- संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे परतवारीसाठी आज ३१ जूलै रोजी तब्बल लाखो भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज असून मराठवाडा व विदर्भातून १०० पेक्षा अधिक दिंड्या येणार आहेत. यावेळी दिव्यांगांसाठी थेट दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कुठेही अनुचित घटना घडू नये या दृष्टीने पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अनुचित घटना घडू नये या दृष्टीने पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त तैनात
आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे जाणारे वारकरी व दिंडी सोहळे पंधरा दिवसानंतरच्या एकादशीला नर्सी नामदेव येथे संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतात. पंढरपूर येथे विठ्ठल रुखमाईचे दर्शन घेतल्यानंतर नर्सीत संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्या शिवाय वारी पूर्ण होत नाही असे बोलले जाते. त्यामुळे या वारीला परतवारी म्हणून ओळखले जाते. दरम्यान, यावेळी आज ३१ जुलै रोजी परतवारी होणार आहे. सकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, ओमप्रकाश हेडा, भिकाजी कदम, भिकूलाल बाहेती यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. यावेळी संस्थानचे सर्वच विश्वस्त उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले केले जाणार आहे. नर्सी येथील परतवारीसाठी ३० जुलै रोजी मराठवाडा व विदर्भातील १०० पेक्षा अधिक दिंड्या दाखल झाल्या आहेत. या शिवाय सुमारे ३ते ४ लाख भाविक (devotee) दर्शनासाठी येतील असा अंदाज संस्थान तर्फे वर्तविला जात आहे. सध्या पावसाळी (Rain)वातावरण लक्षात घेऊन सुमारे ६५० फुट लांबीचा वॉटरप्रुफ मंडप (Waterproof Pavilion) उभारण्यात आला आहे.
मंदिराच्या बाहेर एलईडी स्क्रिन (LED Screen)लावण्यात आली असून त्या ठिकाणी भाविकांना ऑनलाईन दर्शन घेता येणार
या शिवाय मंदिराच्या बाहेर एलईडी स्क्रिन (LED Screen)लावण्यात आली असून त्या ठिकाणी भाविकांना ऑनलाईन(Online) दर्शन घेता येणार आहे. या शिवाय दिव्यांग भाविकांसाठी थेट दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी तीन, चाकी, सायकल उपलब्ध करण्यात आल्या आहेत. संस्थानचे पदाधिकारी व स्वयंसेवक या भाविकांना मदत करतील. मंदिराच्या आतील बाजूस आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. त्यामुळे मंदिराचा आतील भाग विद्युत रोषणाईने उजळणार आहे. नर्सी येथील परतवारी निमित्त मागील आठवडाभरापासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. २ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत ह. भ. प. माधव बाबा इंगोले यांचे काल्याचे किर्तन होईल त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. भाविकांची कुठेही गैरसोय होवु नये या दृष्टीने संस्थानचे पदाधिकारी खबदारी घेणार आहेत. लाखो भाविकांची होणारी मांदीयाळी लक्षात घेता मुख्य रस्त्यालगतच वाहन तळाची व्यवस्था करण्यात आली आहे.