कामठी सिटी सर्व्हे ऑफिसमध्ये वाढला भ्रष्टाचार
देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर () : शेत जमिनीचे पोट हिस्से करून क प्रत देण्याचा बदल्यात 60 हजाराची लाच रक्कम स्विकारणाऱ्या कामठी सिटी सर्व्हे कार्यालयातील आरोपी भ्रष्ट लाचखोर भु करमापकास लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून रंगेहात अटक केली. एसीबीच्या या कारवाईनंतर कामठी सिटी सर्व्हे कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्याच्या प्रचंड खळबळ उडाली.
वैभव अशोकराव पळसापुरे, असे आरोपी लाचखोर भ्रष्ट (Land tax surveyor) भूकर मापकाचे नाव आहे. तो कामठी येथील उप अधीक्षक, (Kamathi City Survey) सिटी सर्व्हे (भूमी अभिलेख) कार्यालयात कार्यरत होता. प्राप्त तक्रारीनुसार, 30 वर्षीय फिर्यादी यांच्या पत्नीसह तिच्या बहिणीच्या नावे मौजा पावनगाव, कामठी जि. नागपुर येथे भुमापन क्रमांक 40/1 मधील 3.27 हेक्टर शेत जमीन आहे. या जमीनीचे पोट हिस्से करून त्याची क प्रत देण्यासाठी कार्यरत असलेले वैभव अशोकराव पळसापुरे, मोजणी कर्मचारी यांनी पडताळणीची वेळी 60,000 रु. लाचेची मागणी करून प्रकरण प्रलंबित ठेवले होते.
उलट पदाचा व अधिकाराचा गैर वापर करून तक्रार कर्त्याची अडवणूक करीत लाचेसाठी त्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला. शेवटी तक्रारकर्त्यास लाच रक्कम द्यायची नसल्याने त्यांनी एसीबी कार्यालय गाठले. एसीबीने लगेच त्यांच्या तक्रारीची दखल घेत पडताळणी केली आणि वेळीच सापळा रचला. यावेळी लाचखोर वैभव पळसापुरेला ६० हजाराची लाच रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी (Land tax surveyor) एसीबीने लाचखोर आरोपी पळसापुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तत्पूर्वी दोन पंचासमक्ष आरोपीच्या ताब्यातून लाच रक्कम 60 हजार रुपये जप्त करण्यात आले.
दक्षिणेशिवाय होत नव्हती कुठलीच कामे
गेल्या काही वर्षांपासून कामठीतील या कार्यालयात भ्रष्टाचार चांगलाच फोफावला होता. कुठलेही काम शासनाने घालुन दिलेल्या कालावधीत होत नव्हते. येथील साहेब सुद्धा प्रकरणे निर्धारित कालावधीत निकाली न काढता प्रलंबित ठेवण्यासाठी प्रवृत्त करायचा. संगनमताने नागरिकांची अडवणूक केल्या जायची. अशा प्रकारे येथे कुठलेही काम पैसे घेतल्याशिवाय होत नव्हते. त्यामुळे येथील साहेबांची सुद्धा एसीबीने चौकशी केल्यास मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे सुद्धा बेहिशोबी चल-अचल संपत्ती आढळू शकते. दुसरीकडे, एसीबीने सापळा रचताच रंगेहात पकडल्या गेल्याचे लक्षात येताच आरोपी लाचखोर पळसापुरे यांनी शोचालयात लपण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र, (Kamathi City Survey) एसीबीच्या पथकाने तत्पूर्वीच त्याच्या मुसक्या आवळल्या.