वर्तमान वास्तव्य व विदर्भ राज्याची गरज चर्चासत्रात विद्यार्थ्यांशी साधला संवाद
देशोन्नती वृत्तसंकलन
कोरपना (Ashok Wankhede) : वर्तमानाबाबत आजची तरुण पिढी काय विचार करतात त्यांना काय हवं ते कुठे जातात ते काय करतात त्यांना काय करायला पाहिजे हे कळायला खुप महत्वाचे असून ज्या जन्मभूमीत आपण जन्माला येतो त्याचे आपल्यावर उपकार असतात आणि ते आपल्याला फेडावे लागतात असे मोलाचे मत शरद पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर मराठी विभागाच्या वतीने आयोजित वर्तमान वास्तव्य व विदर्भ राज्याची गरज या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र कार्यक्रमात विद्यार्थी व तरुणांशी संवाद साधताना जेष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे (Ashok Wankhede) मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते
कार्यक्रमचे सरस्वती शिक्षब प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.आंनदराव अडबाले, तुळशीराम पुंजेकर उपाध्यक्ष , नामदेव बोबडे सचिव, नोगराज मंगरूळकर संचालक, माधवराव मंदे संचालक, प्राचार्य डॉ.संजय कुमार सिहं,प्रा. विजय आकणूरवार डॉ. हेमचंद दुधगवळी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मूळचे यवतमाळ जिल्यातील आर्णी तालुक्यातील असलेले पत्रकार अशोक वानखेडे यांनी आपल्या शिक्षण घेताना यवतमाळातून सातारा ला जाऊन शिक्षण घ्यावे लागले आणि आपल्या कुटुंबातील आपल्याला भेटायला यायचे म्हटले तर तासनतास प्रवास करावा लागायचा जर ते कॉलेज तेव्हा विदर्भात असते तर ? तेव्हाचा असा प्रसंग ही त्यांनी विदयार्थ्यांना सांगितला
मागील तीस वर्षपासून दिल्ली मध्ये असताना पंजाब, हरियाणा,उतराखंड, तेलंगाणा, हिमाचल त्यासोबत छत्तीसगड, व तेलंगाणा यांच्यासाठीचा संघर्ष पहिला आणि त्यातून जन्म झालेले हे छोटे छोटे राज्य पाहिले तर दिल्लीतून पंजाब व हरियाणा मध्ये जाऊन एका दिवसात काही तासातच आपण जाऊन वापस येऊ शकतो आणि ते राज्य वेगळे होऊन विकास व प्रगती साध्य करू शकते जेव्हा तेलगू भाषिक दोन राज्य व हिंदी भाषिक दोन ते तीन राज्याची निर्मिती होऊ शकते तर तेव्हा प्रश्न पडतो तर महाराष्ट्र मध्ये राहून पुणे मुंबईच दोन चार मोठे शहर आमच्या नशिबी हेच का विदर्भ राज्य वेगळे का नाही?
विदर्भातील अनेक जिल्यातील शिक्षण घेणाऱ्या तरुण वर्गाची आज अवस्था दयनीय आहे पदवीधर आहेत पण नौकरी नाही नौकरी साठी पुणे मुंबई शहरात त्यात मिळणाऱ्या वेतनात तिथे राहणे व खर्च त्यापेक्षा आपल्या हक्काचा विदर्भ वेगळा झाल्यास आपल्याला जास्तीत जास्त नागपूर शहर किव्हा आपल्याच जिल्यात नोकरी मिळू शकते. आजपर्यंत राजकाऱ्यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्दा निवडणुकी पुरता घेऊन राजकारन केले सर्व राजकीय पुढारी विदर्भ राज्य वेगळे देतो म्हणतात परंतु देत नाही आता आपले हक्क व स्वातंत्र्य मागून मिळणार नाही हिसकावून घेतल्या शिवाय पर्याय नाही पुढे विदर्भावर येणारा काळ भयंकर आहेत तेव्हा आताच वेळ आहेत जागे होण्याची नाहीतर आपली मुले व नातवंड आपल्या प्रतिमेला जोडे मारतील यांनी आम्हाला अशा राज्यात ठेवले ज्यात खायला तर सोडाच प्यायला सुद्धा शुद्ध पाणी मिळत नाही असे दुर्दैव आपले आहेत हे आपण जाणले पाहिजे
शेतकऱ्यांच्या परस्थीतीवर बोलताना आमचा बाप जेव्हा दिवसभर शेतात राबून घरी झोपताना लेकरू त्याच्या छातीवर हात ठेऊन झोपतो त्यामागचे कारण म्हणजे बापाचे हृदय धकधक करताय की नाही एवढी विदारक परस्थिती आमच्या शेतकरी बापाची आहे कारण विज निर्मिती साठी जमीन आमची आमच्याच जिल्ह्यात वीज निर्मित परंतु शेतात सिंचनसाठी चोवीस तास वीज नाही वीज आहेत तर सरकारला विदर्भात धरणे किती हे माहिती नाही,पेरणी केली तर पाऊस नाही पाऊस आहेत तर पिकाला भाव नाही त्यामुळे महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विदर्भातील शेतकऱ्यांची नोंद आहे अशी विदारक परस्थिती विदर्भाची असून सरकारच्या शेतकरी धोरणविषयीं त्यांनी चांगलाच समाचार घेतला. संचालन कु. उज्वला जाणवे यांनी केले तर आभार डॉ. शरद बेलोरकर यांनी मानले यावेळी सर्व प्राध्यपक शिक्षकेत्तर कर्मचारी पत्रकार व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.