लातूर (Latur) :- लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे 28 व्या लातूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत आणि व्हॉलिबॉल सामना (Volleyball match) खेळत थाटात शुभारंभ केला.
मशाल पेटवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर गुरुवारपासून 28 व्या लातूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा-2024 सुरू झाली. लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत पोलीस मुख्यालयाच्या (Police Headquarters) कवायत मैदानावर पोलीस साठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या उपस्थितीत मशाल पेटवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल हॉकी इतर ऍथलेटिक्स खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 30 नोव्हेंबर पर्यंत पार पडणार असून संपूर्ण लातूर जिल्ह्यातील विविध शाखा व पोलीस ठाण्याला कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व अमलदारांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. विविध ठाण्यातील व शाखेतील पोलिसांनी यावेळेस शानदार संचालन केले.
पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी
30 नोव्हेंबरला सदर क्रीडा स्पर्धातील विजयी खेळाडूंना श्री.अमीरुल हसन अन्सारी, उपमहानिरीक्षक,(प्राचार्य सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्र,लातूर) यांचे हस्ते बक्षीस वितरण क्रीडा (Sports) स्पर्धेचा समारोप होणार आहे. पोलिसांच्या कला व क्रीडा गुणांना वाव मिळावा, आरोग्य चांगले राहावे यासाठी सुरू असलेल्या या स्पर्धेत पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.