लातूर (Latur) :- लातूरमध्ये नेत्यांसाठी लोकनेत्याचे स्मारक लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. एक दोन महिने नव्हे, तर तब्बल दोन वर्षांपासून मराठवाड्याचे भूमिपुत्र गोपीनाथराव मुंडे यांचे स्मारक धूळ खात पडले आहे. दैनिक ‘देशोन्नती’ने (Deshonnati) याबाबत काही दिवसांपूर्वी वृत्त दिल्यानंतर या स्मारकाचे लोकार्पण होईल व लोकनेत्याच्या पुतळ्याचे अनावरण होईल, (Unveiling of the statue) अशी आस लागून राहिली होती. मात्र या पुतळ्यावरील आवरण बदलून स्मारक आवरणातच त्यामुळे या स्मारकाचे (monument) अनावरण कधी? असा सवाल मुंडे समर्थकांमध्ये केला जात आहे. स्मारकाच्या लोकार्पणासाठी नेत्यांना वेळ नसल्याने गोपीनाथरावांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
गोपीनाथ मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी
राज्यात ज्यांनी भाजपा वाढविली, सत्ता नसतानाही पक्षाची विचारधारा जनसामान्यात रुजविणारे भारतीय जनता पक्षाचे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक तीन वर्षांपूर्वी लातूर जिल्हा परिषदेने विलासराव देशमुख यांच्या स्मारका शेजारी उभे केले. मात्र या स्मारकाच्या लोकार्पणासाठी नेत्यांना वेळ नसल्याने दोन वर्षांपासून स्मारक आवरणात बंद पडून आहे. विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे या दोघांनीही 1980 च्या दशकात विधानसभेत गेले. देशमुख हे काँग्रेसचे, तर मुंडे हे विरोधी पक्षाचे नेते. दोघांची मैत्री असल्याने त्यांनी एकदाही एकमेकांना पाडायचा प्रयत्न केला नाही. उलट एखादा अडचणीत असेल तर त्याला सहकार्य करीत मैत्रीचे नाते अधिक दृढ करण्याचाच त्यांनी प्रयत्न केला. हीच आठवण लक्षात घेत लातूर जिल्हा परिषदेत दोघांचे स्मारक शेजारीच उभारण्यात आले.
दोन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री होते, सध्या मुख्यमंत्री आहेत, त्यावेळी त्यांनी गोपीनाथरावांच्या स्मारकाच्या अनावरणासाठी येण्याचे मान्य केले होते. परंतु वेळेअभावी फडणवीसांना शक्य झाले नाही. त्यामुळे येथील स्मारकाचे लोकार्पण रखडले आहे. त्यामुळे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीतही स्मारक अनावरण सोहळा होऊ शकतो, असे आता मुंडे समर्थक बोलत आहेत.
