लातूर (Latur):- वाशिम जिल्ह्यातील 1 कोटी रुपयांच्या बॅग लुटीच्या गुन्ह्यातील गुन्ह्यातील फरार आरोपीला लातूर स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले.
चालकास अडवून त्याला रॉडने मारहाण
10 जानेवारीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, वाशिम जिल्ह्यातील वाशिम शहर पोलीस स्टेशन (Police Station)येथे दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी औसा रोडवरील एका लग्नकार्यालयाच्या पार्किंगमध्ये थांबलेला असल्याची माहिती मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ सदर ठिकाणी पोहोचून इसमास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता नमूद इसमाने त्याचे नाव स्वप्निल परसराम पवार, (वय 28 वर्ष, राहणार तोंडगाव, वाशिम) असे असल्याचे सांगितले. त्याने दिनांक 09/01/2025 रोजी हिंगोली गेट उड्डाणपूल जवळ, वाशिम येथे एका स्कुटी मोटरसायकल चालकास अडवून त्याला रॉडने मारहाण (beating) करून त्याच्याकडील 1 कोटी 15 लाख रुपयेची बॅग जबरदस्तीने चोरल्याचे सांगून पोलिसांच्या भितीने वाशिम जिल्ह्याच्या बाहेर पडून आल्याचे सांगितले.
वाशिम जिल्हा पोलिसांशी संपर्क साधला असता पोलीस ठाणे वाशिम शहर गुन्हा क्रमांक 63/2025 कलम 309 (6) 3 (5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून नमूद आरोपीस वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कारवाई पोलीस अमलदार मोहन सुरवसे, युवराज गिरी, अर्जुन राजपूत, दीनानाथ देवकाते, मुन्ना मदने यांनी केली.