लातूर(Latur) :- राज्यात नावलौकिक असलेल्या तसेच मराठवाड्यात (Marathwada)सर्वात मोठ्या असलेल्या लातूरच्या उच्चतम कृषीउत्पन्न बाजार समितीचा (Agricultural Produce Market Committee) आडत बाजार १६ दिवसांपासून ठप्पच असल्याने मंगळवारी (दि.१६) आडते तसेच हमाल-मापाड्यांनी अर्धनग्न होत आक्रमक होत आंदोलने केली. हमाल-मापाड्यांनी उलटी हलगी वाजवत बाजार समितीसमोरच मंडळाच्या निष्कियतेचा निषेध नोंदविला.
बाजार समितीपुढे घुमला उलट्या हलगीचा नाद
लातूर आडत बाजारात दररोजची कोट्यवधीची उलाढाल ठप्प असताना सभापती, संचालक मंडळ, जिल्हा उपनिबंधक, जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मूकपणे या आंदोलनाकडे पाहत आहे. खरेदी शेतमालाची रक्कम खरेदीदारांनी आडत्यांना तात्काळ द्यावी, हा बाजारसमितीने काढलेला आदेश खरेदीदार मानायला तयार नाहीत. जिल्हा उपनिबंधक बदनाळे हेही कठोर भूमिका घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे खरेदीदारांनी ऐन ओळखली असून खरेदी शेतमालाचे पेमेंट पूर्वीप्रमाणेच १६ दिवसांनी देण्याची भूमिका कायम ठेवत सौद्यात न उतरण्याच्या निर्णयावर ते ठाम आहेत.
परिणामी मंगळवारी बाजार समिती कार्यालयासमोर हमाल-मापाड्यांनी उलटी हलगी वाजवत समितीचा निषेध (Prohibition)नोंदविला. आडत बाजार बंद असल्याने उपासमार सुरू असल्याचेही यावेळी त्यांनी निदर्शनास आणून दिले. आडत्यांनीही समितीसमोर ठिय्या देत बाजार समितीने तोडगा काढावा, अशी मागणी केली. दरम्यान २४ तासात बाजार सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपाचे नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर व अजित पाटील कव्हेकर यांनी दिला आहे.
लातूरच्या आडत बाजाराकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट
शिवाय हमाल-मापाडी या घटकाची उपासमार (starvation) सुरु झाली आहे. लातूरच्या आडत बाजाराकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. दररोज २० ते २५ हजार क्विं. केवळ सोयाबीनची(soybeans) आवक होणारा लातूरचा आडत बाजार आहे. याशिवाय इतर शेतमाल मोठ्या प्रमाणात या आडत बाजारात येतो. दररोज कोट्यवधीची उलाढाल होणारा हा आडत बाजार १५ दिवसांपासून बंद असूनही याकडे बाजार समितीचे मार्गदर्शक व राज्याचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांचे दुर्लक्ष झाले आहे. आडत बाजारात खरेदी झालेल्या शेतमालाची रक्कम खरेदीदारांनी आडत्यांना तात्काळ द्यावी, असा आदेश प्रथमत:च लातूरच्या बाजार समितीने काढला. पूर्वापार लातूरचे खरेदीदार पंधरवड्यानंतर खरेदी शेतमालाची रक्कम आडत्यांना देत होते.
मात्र गेल्या वर्षभरात काही खरेदीदारांनी शेतमालाची रक्कमच आडत्यांना न दिल्याने आडते गोत्यात आले. जवळपास ७ कोटींची ही रक्कम असल्याची चर्चाही आहे. या पार्श्वभूमीवर आडत्यांनी खरेदीनंतर तात्काळ पेमेंटची मागणी लावून धरली. त्यावर बाजार समितीने आदेश काढला. मात्र बाजार समितीचा आदेश जाचक असल्याने त्यास विरोध करत व्यापार्यांनी आडत बाजारात सौद्यावर येणेच बंद केले. परिणामी गेल्या पंधरवड्यापासून आडत बाजार ठप्प आहे.