देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur: कव्हेकरांविषयी वडीलकीचा आदर माझ्या मनी कायम!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Latur: कव्हेकरांविषयी वडीलकीचा आदर माझ्या मनी कायम!
लातूर

Latur: कव्हेकरांविषयी वडीलकीचा आदर माझ्या मनी कायम!

web editorngp
Last updated: 2025/01/27 at 1:08 PM
By web editorngp Published January 27, 2025
Share
Latur

लातूरच्या पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात पालकमंत्री शिवेंद्रराजे यांची ग्वाही…

लातूर (Latur) : भाजपा नेते तथा माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर (Shivajirao Patil Kavekar) साहेबांनी माझे वडील तत्कालीन मंत्री अभयसिंहराजे भोसले (Abhay Singh Raje Bhosale) यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी वडीलकीचा आदर माझ्याही मनी कायम राहणार आहे. त्यामुळे या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये अधिकारांने माझ्याकडून कामे करून घ्या, असे सांगतानाच आपल्या अनुभवाची मदत घेऊन विकासाला गती देऊ, लातूरला पुन्हा गतवैभव मिळवून देऊ, अशी ग्वाही लातूरचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

सारांश
लातूरच्या पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात पालकमंत्री शिवेंद्रराजे यांची ग्वाही…जेएसपीएमच्या महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालय इमारतीचे भूमिपूजन!लातूर भाजपाचा बालेकिल्‍ला!भोसले आणि कव्हेकर परिवाराचे ऋणानुबंध कायम!

जेएसपीएमच्या महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालय इमारतीचे भूमिपूजन!

भाजपा नेते तथा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या जेएसपीएम संस्था (JSPM Institute) संचालित महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाच्या (Nursing College) भव्य इमारत भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपा नेते माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. प्रतिभाताई पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे उपाध्यक्ष तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, जेएसपीएमचे कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, भाजपा महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा रागिणीताई यादव, प्राचार्य आर.एस.अवस्थी, नर्सिंगच्या प्राचार्या सिरीन सॅमसन, प्रताप शिंदे, पतंजलीचे महाराष्ट्र प्रभारी विष्णू भूतडा, प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य मारुती सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंग कॉलेजच्या इमारतीचे भूमिपूजन झाले, असे त्यांनी जाहीर केले. लातूरचा पालकमंत्री म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी माझ्यावर जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे शहरातील पाणी प्रश्‍न, कचरा यासह सर्व प्रश्‍न मार्गी लावण्याचे काम करू. लातूर शहराच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने जे-जे चांगले करता येईल, ते करून लातूर शहराचे गतवैभव पुन्हा मिळवून देण्याचे एकजुटीने काम करू, अशी ग्वाही पालकमंत्री ना. शिवेंद्रराजे यांनी दिली.

लातूर भाजपाचा बालेकिल्‍ला!

लातूर जिल्ह्यामध्ये सहा पैकी पाच आमदार महायुतीचे आहेत. त्यामुळे लातूर भाजपाचा बालेकिल्‍ला म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. आपल्या कालावधीत शासकीय दवाखान्याचा (Government Hospital) प्रश्‍न मार्गी लावू. याबरोबरच पाण्याचाही विषय महत्त्वाचा आहे. पाणी प्रश्‍नाबाबत सगळीकडे वादाचा विषय होतो. त्यामुळे यावर आता काही बोलणार नाही. परंतु याबाबत माहिती घेऊन त्याबाबतही काही करता येईल का ते आपण येणार्‍या काळात पाहू. असा विश्‍वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केला.

भोसले आणि कव्हेकर परिवाराचे ऋणानुबंध कायम!

आज माजी मंत्री अभयसिंह राजे भोसले यांचे चिरंजीव शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे आगमन लातूर शहरात झाल्यामुळे सगळीकडे नवचैतन्य निर्माण झाले आहे. भोसले परिवाराचे आणि कव्हेकर परिवाराचे ऋणानुबंध कायम आहेत. मी युवक काँग्रेसचा (Congress) प्रदेश उपाध्यक्ष होतो. त्यावेळी तत्कालीन मंत्री अभयसिंह राजे भोसले हे काहीवेळा लातूरला आले होते. ते ऋणानुबंध कायम ठेवण्याचे काम त्यांचे चिरंजीव छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून होत आहे, असे गौरवोद्गार माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यावेळी काढले.

You Might Also Like

MNS Morcha: पन्नगेश्वर कारखान्यावर मनसेचा मोर्चा

Latur old farmer: आणखी एका वृद्ध शेतकऱ्याच्या खांद्यावर जोखड!

B.G. Kolse Patil: मोदी विरोधात संघटित होण्याला विरोध करणारा कायदा!

Government Technical College: महाराष्ट्रात 60 हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला!

Farmers Aandolan: पन्नगेश्वर साखर कारखान्यासमोर, शेतकरी संघटनेचा अडीच तास रास्ता रोको!

TAGGED: Abhay Singh Raje Bhosale, CM Devendra Fadnavis, Congress Regional Vice President, Government Hospital, Guardian Minister, JSPM Institute, latur, Nursing College, Shivajirao Patil Kavekar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाअध्यात्मपरभणी

Parbhani: पंढरपूर वारीसाठी वारकर्‍यांसह भाविकांची एसटीला पसंती !

Deshonnati Digital Deshonnati Digital July 17, 2024
प्रतिष्ठेच्या लढती….!
Gondia Bribery: लाचखोर सपोउपनि एसीबीच्या जाळ्यात
Murder: सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाने केली आत्महत्या
Little Girl Murder: ‘पप्पा मला चॉकलेट द्या! द्या ना हो… पप्पा मला चॉकलेट द्या…’
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

MNS Morcha
मराठवाडालातूर

MNS Morcha: पन्नगेश्वर कारखान्यावर मनसेचा मोर्चा

July 11, 2025
Latur old farmerLatur old farmer
मराठवाडालातूरशेती

Latur old farmer: आणखी एका वृद्ध शेतकऱ्याच्या खांद्यावर जोखड!

July 11, 2025
B.G. Kolse Patil
मराठवाडालातूर

B.G. Kolse Patil: मोदी विरोधात संघटित होण्याला विरोध करणारा कायदा!

July 11, 2025
Government Technical College
लातूरमराठवाडा

Government Technical College: महाराष्ट्रात 60 हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला!

July 10, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?