आ. कराडांच्या निवासस्थानी दिली शंकरराव भिसे यांनी ‘सदिच्छा’ भेट
लातूर (Latur Assembly Constituency) : दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचे एकेकाळी स्वीय सहाय्यक राहिलेले आणि लातूर ग्रामीणचे माजी आमदार ॲड. त्र्यंबकराव भिसे यांचे बंधू असलेले शंकरराव भिसे (Shankarao Bhise) हे विधानसभा निवडणुकीच्या (Latur Assembly Constituency) तोंडावर भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा लातूरमध्ये रंगली आहे. सोमवारी त्यांनी भाजपाचे विधान परिषद सदस्य रमेशआप्पा कराड यांच्या निवासस्थानी ‘सदिच्छा’ भेट दिल्याने भाजपा प्रवेशावर लवकरच शिक्कामोर्तब होईल, असे मानले जात आहे.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ (Latur Assembly Constituency) हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात प्रथम वैजनाथ शिंदे हे काँग्रेसचे आमदार झाले. त्यानंतर त्र्यंबकराव भिसे यांना काँग्रेसने याच मतदारसंघातून संधी दिली व ते आमदार झाले. त्यानंतर या मतदारसंघात काँग्रेसने दिवंगत लोकनेते विलासरावजी देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांना उमेदवारी दिली आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा दारुण पराभव करीत ते विजयी झाले.
गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर (Latur Assembly Constituency) राज्यामध्ये अनेक स्थित्यंतरे झाली. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत शिवसेना यांची महाविकास आघाडी निर्माण झाली आणि या आघाडीने अडीच वर्षे सरकार चालविल्या नंतर शिवसेनेमध्ये बंड होत राज्यातील सरकार बदलले गेले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे यांची शिवसेना व भाजपा असे महायुतीचे सरकार सत्तेत आले. त्यामुळे लातूर ग्रामीणची महायुतीतील जागा शिवसेनेची की भाजपाची? हे अद्याप स्पष्ट नाही.
असे असताना भाजपाचे विधान परिषद सदस्य रमेशआप्पा कराड यांनी ग्रामीणमध्ये भाजपा निवडणूक लढविणार व उमेदवार मीच राहणार, अशी गर्जना केली. दुसरीकडे भाजपाचे नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनीही या (Assembly Elections) मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. अशातच रमेशआप्पा कराड यांच्या निवासस्थानी काँग्रेसचे माजी आमदार ॲड. त्र्यंबकनाना भिसे यांचे बंधू तथा निवृत्त सनदी अधिकारी शंकरराव भिसे यांनी सोमवारी ‘सदिच्छा’ भेट दिली. या भेटीनंतर समाज माध्यमावर त्यांची छायाचित्रे व्हायरल झाली. शंकरराव भिसे भाजपात जाणार, अशी चर्चाही सुरू झाली आहे.
शंकरराव भिसे हे दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले आहेत. सेवानिवृत्तीनंतर (Latur Assembly Constituency) लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढविण्याबाबत ते चाचपणी करीत असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांना एकंदर घटनेबाबत विचारले असता, ‘आपण सदिच्छा भेट घेतली, अजून तसे काही नाही’, असे ते म्हणाले.
‘फोनवर सांगता येत नाही, प्रत्यक्ष बोलू!’
दरम्यान भाजपाचे विधान परिषद सदस्य रमेश आप्पा कराड यांच्याशी शंकरराव भिसे यांच्या भेटीचा संदर्भ देत ‘ शंकरराव भिसे (Shankarao Bhise) भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत का असा प्रश्न केला असता कराड म्हणाले, ‘फोनवर सांगता येत नाही, प्रत्यक्ष बोलू!’