वंचित बहुजन आघाडीला मतदान करा -ॲड. सर्वजीत बनसोडे
लातूर (Latur Assembly Election) : आरक्षणवाद्यांनी आपले आरक्षण वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करावे, असे आवाहन केले. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील (Latur Assembly Election) वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार विनोद खटके यांच्या प्रचारार्थ पूर्वभागातील जय भीम नगर या ठिकाणी झालेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिरसाठ हे उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा स्टार प्रचारक एडवोकेट सर्वजित दादा बनसोडे प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन सेनेचे प्रदेश महासचिव प्रा युवराज धसवाडीकर, मराठवाडा महासचिव रमेश, गायकवाड जिल्हाध्यक्ष सलीमभाई सय्यद, शहराध्यक्ष सचिन गायकवाड, महिला शहराध्यक्ष सुजाताताई अजनीकर, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ कोरडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सर्वजित दादा बनसोडे यांनी उपस्थित मतदारांना उद्देशून कसल्याही आमिषाला बळी न पडता वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार विनोद खटके यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे. या सभेमध्ये धसवाडीकर म्हणाले, विनोद खटके यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन विधानसभेत आपले प्रश्न मांडण्यासाठी पाठवायचे आहे. काँग्रेसने बाबासाहेबांना ज्या पद्धतीने निवडणुकांमध्ये पराभूत केले, त्याची फेड करण्याची वेळ आता मतदारांच्या हातात आलेली आहे. मतदारांनी ही संधी न दवडता वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले.
चिमुकलीने दिले खाऊचे पैसे!
ही सभा चालू असताना जय भीम नगर परिसरातील संघमित्रा विशाल जगताप या छोट्या मुलीने आपल्या खाऊचे जमा केलेले पैसे विनोद खटके यांना भेट दिले. यावेळी उपस्थित मतदारांमध्ये उत्साह संचारला. उपस्थितांनी ‘विनोद खटके तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. या कॉर्नर सभेला भोई समाजातील सर्व बंधू भगिनी उपस्थित होते. तसेच जय भीम नगर इंदिरानगर, राजीव नगर परिसरातील असंख्य बंधू भगिनी उपस्थित होते. ही कॉर्नर सभा यशस्वी करण्यासाठी जय भीम नगर परिसरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.