पत्रकार संघाच्या अध्यक्षाच्या उमेदवारीमुळे लातूर शहराची निवडणूक चौरंगी!
लातूर (Latur Assembly Election) : लातूर शहर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिवसेंदिवस चुरस निर्माण होताना लातूरची निवडणूक जनतेने हातात घेतली आहे, असे स्पष्ट दिसत असताना धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक होत असून लातूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे हे (Latur Assembly Election( निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने लातूर शहर मतदारसंघाची निवडणूक ही चौरंगी होणार आहे हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.
नरसिंह घोणे हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्रे, संपादक यांच्या अडचणी व संकटात कायम पुढे असतात. म्हणजेच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे रक्षक असलेले नरसिंह घोणे हे आता लातुरात लोकशाही जिवंत आणि कायम ठेवण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होत असल्याने परिचय पत्र व आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून नरसिंह घोणे हे मतदारसंघात पोहचत आहेत. नरसिंह घोणे यांनी यापूर्वी उदगीर मतदारसंघाची देखील (Latur Assembly Election) विधानसभा निवडणूक लढवली आहे.
लातूर शहर मतदारसंघाची निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची होत आहे. कायम धनदांडगे उमेदवार आणि मॅनेज विरोधक यामुळे ही निवडणूक कायम एकतर्फी होत आली आहे. मात्र यंदा ही निवडणूक खऱ्या अर्थाने निवडणूक होत असून या निवडणुकीत उतरलेले उमेदवार हे देखील तितकेच तोलामोलाचे आहेत. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार आहे हे अगदी स्पष्ट आहे. काँग्रेसकडून अमित देशमुख, भाजपकडून अर्चना पाटील, वंचित बहुजन आघाडीकडून विनोद खटके असे उमेदवार मैदानात असताना लातूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे हे देखील मैदानात उतरल्याने ही निवडणूक चौरंगी होत आहे. ही (Latur Assembly Election) निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होत असल्याचे सांगत नरसिंह घोणे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.