लातूर (Latur Assembly Election) : गेल्या वर्ष-दोन वर्षात महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics) अत्यंत निचांकी पातळीवर गेल्याचे आपण पाहिले. आपली कोणतीही औकात नसताना किंवा आपला कोणताही आवाका नसताना गेल्या काळात अनेकांनी नको ते धाडस दाखण्याचा प्रयत्न केला. मात्र (Assembly Election) लोकसभा निवडणुकीत मतदारांनी अशा बाजारबुणग्यांना औकातीवर आणल्याने अखेर वातावरण कसं शांत शांत झालं. आता विधानसभेचे वेध लागले आहेत. त्यामुळे लातूर शहरात राजकारण माणसाळताना दिसत आहे. इच्छुक नेते गल्लोगल्ली, घरोघरी फिरत आहेत, गाठी-भेटी घेत आहेत.
लातूर जिल्ह्याचे राजकारण ज्या देशमुखांभोवती फिरते, त्या आ. अमित देशमुखांच्या विरोधात गळा काढून ओरडणारांचा हंगाम गेल्या महिनाभरापासून सुरू झाल्याचे जाणवत आहे. अशा गळाकाढूंनी देशमुखांविरोधात इच्छुकांना ‘प्रमोट’ही केलंय. काहींनी हे करता-करता आपला पक्षच लातूरच्या देशमुखांना ‘मॕनेज’ होतो, असा सूर आळवत पक्षाची बेअब्रू करण्याचे काम चालविले. काही इच्छुकांनी देव पाण्यात घातलेत. कुणी नेत्याला, कुणी संघाला तर कुणी पक्षाचीही खूशमस्करी करण्याचा उठाठेव चालविला आहे. आता या तीन ‘शक्ती’मध्ये कोण भारी पडते, ते लवकरच कळणार आहे.
तूर्तास आ. अमित देशमुखांनी लातूर बघत-बघत बीड, धाराशिवचीही ‘फिल्डींग’ लावण्याचे काम चालविल्याचे दिसत आहे. बागवान बिरादरी, मिनी मार्केटचे व्यापारी अशा घटकांमध्ये ते आता मांडीला मांडी लावून बसत आहेत, गप्पा मारत आहेत, त्यांच्या अडचणी समजून घेत आहेत. (Assembly Election) दुसरीकडे भाजपाकडून प्रबळ दावेदारी करणाऱ्या अर्चनाताई पाटील चाकूरकर याही शहरात विविध भागात गाठी-भेट घेत संवाद साधत आहेत. अब्दुल कलाम नगरसारख्या परिसरातील रस्ता, नाले, दिवाबत्ती अशा विविध समस्याही त्या जाणून घेत आहेत.
विधानसभेला इतर अनेकजण इच्छुक असल्याची चर्चा आहे. मात्र आतापर्यंत थेट लोकांमध्ये शहरातील हे दोन नेते मिसळत असल्याने निवडणुकीची लढत देशमुख विरुध्द चाकूरकर अशीच होण्याची शक्यता अधिक आहे. कदाचित् ‘मॕनेज’चा आरोप एखादेवेळी सत्यात उतरला तर आणखी (Assembly Election) एखादा उमेदवारही सट्ट्यात आला तर नवल वाटू नये. तूर्तास माणसाळलेली वहिवाट लातूरकरांनी कायम पाळावी, म्हणजे झालं!