कव्हेकरांना जिल्हाध्यक्षाचे समर्थन; चाकूरकर गटाला बसला धक्का!
– महादेव कुंभार
लातूर (Latur Assembly Election) : लातूर विधानसभेसाठी मी स्वतः, अजित पाटील कव्हेकर, डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर व रागिणीताई यादव आम्ही चौघांनीही पक्षाकडे तिकीट मागितले आहे. परंतु युवा नेतृत्व अजित पाटील कव्हेकर यांची लातूरच्या प्रश्नासाठीची तळमळ पाहून आपण प्रभावित झालो. त्यामुळे अशा तळमळ असलेल्या युवा नेतृत्वाला माझे समर्थन आहे, असे मी शहर जिल्हाध्यक्ष म्हणून माझी भूमिका स्पष्ट करतो, अशी भूमिका भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी जाहीर केली. यामुळे लातूर शहर (Latur Assembly Election) विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री अमित देशमुख यांच्याविरुध्द जोरदार तयारी करणाऱ्या चाकूरकर गटाला धक्का बसला आहे. इतकेच नव्हे, तर आपण सर्वांनी अजित भैय्यासारख्या धडाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी सक्षमपणे उभ रहावे, असे आवाहन दस्तुरखुद्द भाजपा शहर जिल्हाध्यक्षांनी केल्याने लातूर भाजपातील ‘ट्विस्ट’ वाढला आहे.
भाजपा युमोचे प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या पुढाकारातून जनसेवेचा महायज्ञ व लाभार्थी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी काळे बोलत होते. मेळाव्याला लातूर शहर विधानसभा निवडणूक प्रमुख तथा इच्छुक स्पर्धक आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकरांच्या सूनबाई अर्चनाताई पाटील चाकूरकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दिग्विजय काथवटे, लातूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. प्रतिभाताई पाटील कव्हेकर, संयोजक व इच्छुक उमेदवार अजितसिंह पाटील कव्हेकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस मिनाताई भोसले, भाजपाचे अमोल गित्ते, संजय निराधार समितीचे अध्यक्ष शिवसिंह शिसोदिया, नगरसेविका रागिणीताई यादव, सूर्यकांतराव शेळके, नगरसेवक बालाजी शेळके, सुभाषअप्पा सुलगुुडले, बाबासाहेब देशमुख, उध्दवराव जाधव, भाजपाचे बी.टी.कदम, बाळासाहेब शिंदे, मंडलाध्यक्ष संजय गिर, गोपाळ वांगे,भाजपा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मोहसिन शेख, सिध्देश्वर उकीरडे, मुन्ना हाश्मि शितलताई कुलकर्णी, हणमंत काळे, लताताई घायाळ, अॅड.गणेश गोजमगुंडे, भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष गणेश गोमचाळे, आकाश बजाज, अजय कोटलवार, ओम राठोड, आकाश पिटले, संतोष सरतापे,जावेद शेख, अॅड.पंकज देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्र व राज्यामध्येही भाजपा महायुतीचे सरकार आहे. लातूर जिल्हा परिषद, (Latur Assembly Election) महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. तरीही लातुरात भाजपाचा आमदार नाही, दे दुर्दैव आहे, असेही काळे यावेळी म्हणाले. अजित पाटील यांच्या रूपाने तरूण व उगवते नेतृत्व आपल्याला लाभले आहे. मधल्या कालावधीमध्ये त्यांनाही अडचणी आणण्याचा घाट अनेकांनी घातल्याचे समोर आले. या प्रकरणामध्ये आपला पक्ष आपल्या पाठीशी सक्षमपणे उभा राहिला. परंतु अशा अडचणी निर्माण करणार्यांनाच अडचणीत आणू, असे म्हणत लातूर शहर विधानसभेच्या निवडणूक प्रमुख अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी यावेळी देशमुखांना अप्रत्यक्ष इशारा दिला.
साडेआठ वर्षे मुख्यमंत्री व तेवीस वर्षे मंत्री म्हणून पदावर असतानाही देशमुखांनी (Latur Assembly Election) लातूर शहराचा फारसा विकास केलेला नाही. लातूरच्या विकासात भर पाडणारा एखादा उद्योगही आणलेला नाही, अशी टीका भाजपा नेते माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना केली.