देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur Assembly Elections: अहमदपूरकर म्हणतात, इथे ‘पुन्हा येईन’ नाहीच!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Latur Assembly Elections: अहमदपूरकर म्हणतात, इथे ‘पुन्हा येईन’ नाहीच!
मराठवाडाराजकारणलातूर

Latur Assembly Elections: अहमदपूरकर म्हणतात, इथे ‘पुन्हा येईन’ नाहीच!

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/18 at 8:58 PM
By Deshonnati Digital Published October 18, 2024
Share

राष्ट्रवादीतील फूट अन् भाजपातील काथ्याकूट बाबासाहेबांच्या मुळावर!

– महादेव कुंभार
लातूर (Latur Assembly Elections) : रिडालोससारख्या पक्षाला निवडून देणारा अहमदपूर विधानसभा मतदार संघ (Latur Assembly Elections) हा बहुजन चळवळीचा मतदार संघ असून या विधानसभा मतदार संघातील मतदारांनी एकाच उमेदवाराला सलग दुसऱ्यांदा निवडून दिल्याचा इतिहास नाही. त्यातच राष्ट्रवादीतील फूट आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी चालविलेला काथ्याकूट मुळावर बसल्याने यंदाच्या निवडणुकीत ‘मी पुन्हा येईन’, असे म्हणणाऱ्या विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांची वाट सध्या तरी बिकट झाली आहे.

सारांश
राष्ट्रवादीतील फूट अन् भाजपातील काथ्याकूट बाबासाहेबांच्या मुळावर!‘आधे इधर, आधे उधर’…

2009 च्या विधानसभा निवडणुकीनंतर थेट 2019 मध्ये विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील विजय झाले. 2014 च्या निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार विनायकराव पाटील यांच्याकडून पराभूत झाले होते. 2009 मध्ये रिडालोसकडून विधिमंडळात पोहोचलेले बाबासाहेब 2014 च्या (Latur Assembly Elections) निवडणुकीत भाजपाची प्रचंड लाट असतानाही अपक्ष उमेदवार विनायकराव पाटील यांच्याकडून पराभूत झाले. तर भाजपाही तिसऱ्या स्थानावर राहिला. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी मिळाली आणि 29 हजार 191 मतांचे मताधिक्य घेत त्यांनी भाजपाचे उमेदवार विनायकराव पाटील यांचा पराभव केला. अर्थात् 2019 च्या निवडणुकीचा विचार केला तर भाजपामध्ये दिलीपराव देशमुख व आयोध्या केंद्रे यांनी केलेली बंडखोरी विनायकराव पाटील यांच्या मुळावर आली. त्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार दिलीपराव देशमुख यांना 45 हजार 846 तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आयोध्या केंद्रे यांना 22141 मते मिळाली.

गेल्या दोन वर्षात राज्यामध्ये झालेले सत्ता परिवर्तन चर्चेचा विषय ठरला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतल्याने अहमदपूरचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील अजित पवारांच्या गटात गेले. ही संधी साधत गेल्यावेळी भाजपाकडून लढलेले माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश करत जोरदार धक्का दिला. अर्थात् शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विनायकराव पाटील यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे संकेत आहेत तर अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अहमदपूर विधानसभा मतदार संघात स्थानिक भाजपा नेत्यांनी आमदार बाबासाहेब पाटील यांना प्रचंड विरोध चालविला आहे. अहमदपूर मतदार संघातून काहीही झाले तरी भाजपा स्थानिक नेते एक उमेदवार मैदानात उतरवतील, असा निश्चय करून हे नेते कामाला लागले आहेत. भाजपामध्ये चाललेला हा काथ्याकुट आणि राष्ट्रवादीत पडलेली फूट बाबासाहेब पाटील यांना चांगलीच महागात पडणार आहे.

‘आधे इधर, आधे उधर’…

बोटावर मोजण्याइतपत काही लोक सोडले तर राष्ट्रवादीचा लोंढा शरद पवारांच्या मागे ठाम व भक्कमपणे उभा आहे. गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अहमदपुरात झालेले दौरेच पक्षाला ‘गर्ते’तून बाहेर काढण्यासाठीच होते, हेही लपून राहिले नाही. एकंदर (Latur Assembly Elections) मतदारसंघात महायुतीचा विचार केला तर ‘आधे इधर, आधे उधर’ अशी गत झाली असून उर्वरित ‘बाकी’ पाठीशी घेवून बाबासाहेब कोणते डाव खेळतील, यावर कुस्तीचा निर्णय राहणार आहे.

You Might Also Like

Hingoli Municipality: मोठ्या नाल्यातील पाईप हिंगोली नगरपालिकेच्या पथकाने हटविले

Asha workers march: आशा वर्कर, गट प्रवर्तकांचा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर भर पावसात मोर्चा

Mahavitaran Strike: हिगोलीत महावितरण कर्मचाऱ्यांचा संप

India Communist Party: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा कचेरी समोर धरणे आंदोलन

Bank employees strike: कामगार विरोधी भुमिकेच्या विरोधात बँक कर्मचार्‍यांचा पुकारला संप

TAGGED: Latur assembly elections
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Ayodhya
Breaking Newsअध्यात्मदेश

Ayodhya Ram mandir: अयोध्येच्या समृद्ध परंपरेचा प्रसार

Deshonnati Digital Deshonnati Digital June 6, 2024
Hill Station: ‘हे’ छोटेसे हिल स्टेशन स्कीइंगसाठी स्वर्ग मानले जाते, एकदा नक्की भेट द्या!
MLA Sanjay Gaikwad: 43 कोटीच्या कामांचे भूमिपूजन; भव्य रक्तदान शिबिर, वही-पुस्तक तुला…
Bangladesh violence: बांगलादेशात बदमाशांचा गोंधळ; मशरफी मोर्तझा-लिटन दास यांचे घर जाळले
Chandrapur : चांदा फोर्ट रेल्वे स्थानकाचे लोकार्पण; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘अमृत भारत स्टेशन योजना’ रेल्वे स्थानकांचे लोकार्पण
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: मोठ्या नाल्यातील पाईप हिंगोली नगरपालिकेच्या पथकाने हटविले

July 9, 2025
मराठवाडापरभणी

Asha workers march: आशा वर्कर, गट प्रवर्तकांचा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर भर पावसात मोर्चा

July 9, 2025
मराठवाडाहिंगोली

Mahavitaran Strike: हिगोलीत महावितरण कर्मचाऱ्यांचा संप

July 9, 2025
मराठवाडाहिंगोली

India Communist Party: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा कचेरी समोर धरणे आंदोलन

July 9, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?