औसा व अहमदपूर प्रत्येकी 5 तर उदगीर व निलंगा विधानसभेसाठी प्रत्येकी 6 इच्छुक!
लातूर (Latur assembly elections) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातून जवळपास 22 इच्छुकांनी जिल्हा काँग्रेसकडे विविध विधानसभा मतदार संघातून उमेदवारीची मागणी केली आहे. तथापि लातूर शहर व लातूर ग्रामीणमधून एकाही इच्छुकाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली नाही. याशिवाय काही इच्छुकांनी जिल्हा काँग्रेस शिवाय थेट प्रदेश काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केल्याची माहिती आहे, तथापि त्यांची नावे समजू शकली नाहीत.
लातूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Latur assembly election)s नगारे वाजू लागले आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने तयारीला लागला असला तरी सर्वाधिक बाजी काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात मारली आहे. परवा झालेल्या काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात काँग्रेसने शंखनाद करून विरोधकांना मैदानात उतरण्याचे आव्हान दिले आहे. काँग्रेस व महाआघाडी एकसंघ असून या निवडणुकीत काँग्रेस महाआघाडी जिल्ह्यामध्ये सर्वच जागा जिंकेल, असा दावाही अनेक नेत्यांनी या मेळाव्यात केला.
दरम्यान लातूर जिल्ह्यात लातूर शहर व (Latur assembly elections) ग्रामीण हे दोन मतदार संघ काँग्रेसचे मजबूत मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात माजी मंत्री अमित देशमुख व जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख हे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून जिल्हा काँग्रेसकडे एकाही इच्छुकाने उमेदवारीची मागणी केली नाही. जिल्ह्यातील काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे हे दोन मतदारसंघ असले तरी यावेळी काँग्रेसचा डोळा उदगीर विधानसभा मतदारसंघावर आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून हा मतदार संघ काँग्रेससाठी सोडवून घेत त्या ठिकाणी विद्यमान क्रीडामंत्री संजय बनसोडे यांना चितपट करण्याचा डाव महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसचा असल्याचे परवाच्या मेळाव्यातून स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडे सहा इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे.
लातूर शेजारचा व धाराशिव लोकसभा मतदारसंघात येणारा (Latur assembly elections) औसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडे पाच इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे सध्या आहे या मतदारसंघात काँग्रेसने विशेष असे लक्ष दिल्याचे दिसत नसले तरी या मतदारसंघातून पाच इच्छुकांनी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील निलंगा विधानसभा मतदारसंघ हा माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा बालेकिल्ला मानला जातो मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निलंगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने आपले मताधिक्य स्पष्टपणे नोंदविले आहे. त्यामुळे आगामी (Latur assembly elections) विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसने जोरदार ताकड लावत निवडणूक जिंकण्याची तयारी चालली आहे. निलंगा मतदार संघातून सहा इच्छुकांनी उमेदवारीची मागणी पक्षाकडे केली आहे.