शिवराज पाटलांच्या भूमिकेकडे लातूरकरांचे लक्ष!
लातूर (Shivraj Patil) : लातूर येथे उद्या शनिवारी मराठवाड्यातील काँग्रेसच्या तीन खासदारांचा सत्कार सोहळा (Latur Congress) काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होत असून या सोहळ्यात नवनिर्वाचित खासदारांच्या तसेच त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस जणांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी ज्येष्ठ नेते (Shivraj Patil) शिवराज पाटील चाकूरकर कार्यक्रमास येतील का? याची उत्सुकता लातूरकरांना लागली आहे. काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी चाकूरकरांना भेटून या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले आहे.
काँग्रेस ही सर्व जाती, धर्म व पंथातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांची संघटना आहे. या संघटनेचे स्थानिक नेतृत्व त्या-त्या ठिकाणी फुलत गेले, तसेच ते लातूरलाही फुलत गेले. लातूरमध्ये डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, शिवराज पाटील चाकूरकर आणि विलासराव देशमुख या नेत्यांनी (Latur Congress) काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वातून आपली उंची गाठत थेट राज्य व देशापर्यंत नेतृत्व केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून लातूरमध्ये काँग्रेसचे सत्ता राहिली.
अशा या बालेकिल्ल्यात (Latur Congress) काँग्रेसला देशमुखांची काँग्रेस, निलंगेकरांची काँग्रेस, चाकूरकरांची काँग्रेस असे हीनवण्याची परंपरा काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी सुरू केली. आजही लातूरमध्ये काँग्रेसचे नेतृत्व हे एका विशिष्ट गटाकडे आहे, अशी विचारसरणी असलेले लोक सातत्याने काँग्रेसमध्ये कळ लावण्याचा प्रयत्न करतात. मात्र गेल्या दहा वर्षांचा कार्यकाळ अनुभवल्यानंतर काँग्रेस कार्यकर्तेच नव्हे, तर सर्वसामान्य जनताही काँग्रेसचे नेतृत्व हे आपले नेतृत्व आहे, या भावनेवर आज स्थिरावल्याचे दिसत आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी (Latur Congress) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil यांच्या सुनबाई व सामाजिक कार्यकर्त्या अर्चनाताई पाटील चाकूरकर या भाजपामध्ये दाखल झाल्या. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने लोकसभेला भाजपाच्या पदरात काही लाभ पडेल, अशी आशा भाजपा नेतृत्वाला होती. मात्र लातूर, धाराशिव इतकेच नव्हे, तर नांदेडमध्ये काँग्रेस महाविकास आघाडी यशस्वी झाली. अर्चनाताई पाटील चाकूरकर या काँग्रेसमध्ये फ्रंटफूवर कधीही सक्रिय नव्हत्या. त्यांचे सामाजिक कार्य आपापल्या परीने चालू होते. मात्र चाकूरकरांच्या घरामध्ये फूट पाडून आपल्या पदरात काही पडेल, ही भाजपा नेत्यांची भावना या तिन्ही जिल्ह्यातील नव्हे, तर मराठवाड्यातील लोकांनी धुळीस मिळविली. त्यामुळे आता प्रश्न चाकूरकरांच्या नेतृत्वाचा आहे. ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil) गेल्या काही वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय नाहीत.
मात्र आपली संपूर्ण हयात त्यांनी (Latur Congress) काँग्रेसमध्ये अगदी उच्च पदावर घातली आहे. काँग्रेस हा एक विचार आहे. हा विचार चाकूरकर (Shivraj Patil जगले आहेत. त्यामुळे उद्या काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथाला यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विभागीय मेळावा व काँग्रेस खासदारांच्या सत्कार सोहळ्यास ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil) यांनी उपस्थित राहावे, यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण दिले आहे. सुनबाईच्या भाजपा प्रवेशानंतर ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकरांची नेमकी भूमिका काय? याची उत्सुकता लातूरसह संपूर्ण मराठवाडाच नव्हे, तर देशाला लागली आहे. उद्या होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहून चाकूरकर नवनिर्वाचित खासदार व त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारतील अशी आशा आहे. यावेळी ते काय बोलतात, याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे.