लातूर (Latur Child Marriage) : लातुरात अल्पवयीन मुलीच्या विवाहप्रसंगी (Child Marriage) लग्न मंडपात दाखल होऊन पोलिसांनी मुलगा, दोन्ही बाजूचे नातेवाईक, ब्राह्मण, फोटोग्राफर, स्वयंपाकी व वऱ्हाडी मंडळी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस हेल्पलाइन ११२ वरून खाडगाव रोड लातूर परिसरात एका अल्पवयीन मुलीचा विवाह घडवून येत असल्याबाबतची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी लागलीच चाइल्ड लाईनचे पदाधिकारी यांना याबाबत अवगत करून (Latur Police) पोलीस ताफ्यासह विवाह मंडपात दाखल झाले. पोलीस लग्न मंडपात दाखल झाल्याचे पाहताच वऱ्हाडी मंडळी लग्न मंडपातून भीतीने पसार झाले.
अल्पवयीन मुलीच्या विवाह प्रकरणी गुन्हा दाखल
पोलिसांनी विवाहातील मुला मुलींचे नातेवाईक यांचेकडे अधिक चौकशी केली असता वधू ही अल्पवयीन (Child Marriage) असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी वधूवरांसह त्यांचे नातेवाईकांना शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले. चाइल्ड लाईनच्या अलका संमुखराव यांचे तक्रारीवरून नवरी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असून देखील विवाह लावून दिल्यामुळे नवरदेव, दोन्ही बाजूंचे नातेवाईक, लग्न जमणारे, वधू वराचे मामा, ब्राह्मण, फोटोग्राफर, स्वयंपाकी व १५० ते २०० वऱ्हाडी मंडळी यांचे विरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अन्वये शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास (Latur Police) पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात शिवाजीनगर (Latur Police) पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक लटपटे, पोलीस अंमलदार चौगुले, कोतवाड, कांबळे, शेख, भरोसा सेल, दामिनी पथकाच्या अंमलदार पल्लवी चिलगर आणि चाईल्ड लाईनच्या सुपरवायझर अलका संमुखराव यांच्या पथकाने केली. अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह लावून देण्यात येत असल्यास त्याबाबत तात्काळ पोलिसांना व चाईल्ड लाईनला कळविणेबाबत (Latur Police) लातूर पोलिसांकडून आव्हान करण्यात आले आहे.