अहमदपूर (Latur) :- एका अल्पवयीन मुलीस फूस लावून जबरदस्तीने पळून नेत तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध (Physical relationship)ठेवणाऱ्या आरोपीस अहमदपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने 6 वर्षांची सक्तमजुरी व 30 हजारांचा दंड ठोठावला.
1 वर्ष 14 दिवसात निकाल
याबाबत सविस्तर वृत्त असे की, 14 जानेवारी 2024 रोजी अहमदपूर तालुक्यातील चोबळी येथील रोहित पाटील यांने एका अल्पवयीन मुलीस तिच्या आईसमोरुन पळवून नेले. तिला नांदेड मार्गे आळंदी येथे नेले. तसेच तिच्याशी तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून त्यानंतर वारंवार शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ तपास करून आरोपी व मुलीस ताब्यात घेतले. त्या मुलीची वैद्यकीय तपासणी(Medical examination) करण्यात आली.
अहमदपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा आदेश
वैद्यकीय अधिकारी, पीडिताची आई व पोलिसांच्या जबाबावर आरोपींविरुद्ध भादंवि 363 व पोस्को नुसार गुन्हा दाखल करून अहमदपूर जिल्हा सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. त्याची सुनावणी बुधवारी (दि.29) पूर्ण होऊन अहमदपूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र वडगावकर यांनी आरोपीस सहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा, तसेच 30 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सहाय्यक पोलीस निरीक्षक के. एस. पठाण यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण केला. या खटल्यात सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील ऍड. महेश पाटील यांनी तर त्यांचे सहाय्यक म्हणून संतोष देशपांडे यांनी काम पाहिले.