जळकोट तालुक्यात ४० हजारांवर शेतकरी खरीप पीकविम्यापासून वंचित
– संगमे डोंगरे
जळकोट (latur Crop insurance) : जळकोट तालुक्यात ४० हजारांवर शेतकरी गतवर्षीच्या खरीप (Crop insurance) पीकविम्यापासून वंचित असून तालुक्यातील शेतकरी १३२ कोटींच्या पीकविम्याला मुकला आहे. विमा कंपनीने पूर्णपणे डावलल्याने व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे. गतवर्षी जळकोट तालुक्यातील शेतकर्यांनी खरीप हंगामाचा पीकविमा मोठ्या प्रमाणात भरला होता.
मात्र खरीप हंगामात दीर्घकालीन पावसाचा खंड पडल्याने मोठे नुकसान झाले त्यामुळे उत्पन्नात घट झाली. काढणी पश्चातही सोयाबीनचे मोठे नुकसान झाले होते. या व अशा विविध कारणांनी तालुक्यात सोयाबीन हातचे गेले.त्याबाबत कृषी, महसूल व विमा कंपनीने संयुक्त पंचनामेही केले. महसूल प्रशासनाच्या अहवालानंतर व शेतकर्यांच्या रोषाने अखेर तालुक्यातील शेतकर्यांना २५ टक्के अग्रीम पीकविमा जिल्हाधिकार्यांनी जाहीर केला. मात्र आजतागायत तालुक्यातील ४० हजारांवर शेतकर्यांना तो मिळाला नाही. उर्वरित १९ हजारांवर शेतकर्यांना ७५ टक्के विमा मिळाला नाही.
तालुक्यात ५९ हजार २८५ शेतकर्यांनी विमा हप्ता भरला. त्यात राज्याचा १० व केंद्राचा ६ कोटी असा १६ कोटी ५९ हजार २८५ विमा हप्ता (Crop insurance) कंपनीकडे भरला गेला. त्याची विमा संरक्षित रक्कम १४१ कोटींवर जाते. पैकी स्थानिक अपीलातंर्गत ९१४ शेतकर्यांना ३७ लाख ४० हजार ५३९, काढणीपश्चात नुकसान झालेल्या २१३ शेतकर्यांना ८ लाख प्रतिकूल हवामानामुळे १५ हजार १७६ शेतकर्यांना ७ कोटी ४५ लाख आणि उत्पन्न घट झाल्याने ३ हजार ३१२ शेतकर्यांना ४९ लाख, अशी तालुक्यात १९ हजार ६१५ शेतकर्यांना ८ कोटी ४१ लाख ९ हजार १३८ रुपये इतकीच रक्कम मिळाली. तालुक्याला १३२ कोटी ५८ लाख ९० हजार ८६२ इतकी रक्कम विमा कंपनीकडून मिळणे अपेक्षित असताना तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी याबाबत पाठपुरावा न केल्याने शेतकर्यांचे अपरिमित नुकसान झाले.
ना. बनसोडे यांचे दुर्लक्ष
शेतकर्यांनी कष्टातून पैसे भरलेला पीकविमा अजून विमा कंपनीने खात्यावर टाकला नाही.जळकोट तालुक्यातील शेतकर्यांकडे ना .संजय बनसोडे यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पीकविमा मिळाला नाही .
– शेतकरी माधव तिलमिलदार, जळकोट .
शेतकर्याला कोणी वाली नाही
शेतकर्याला वाली कोणी नाही. पीकविमा कंपनी मनमानी कारभारामुळे शेतकर्याला (Crop insurance) पीकविमा देत नाही. शेतकरी आर्थिक संकटात आहे. वेळेवर पाऊस पडत नाही.त्यामुळे हक्काचा पीकविमा मिळावा,याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.
-शेतकरी बसवराज काळे, जळकोट.
रास्तारोकोचा इशारा
शेतकर्याला पीकविमा (Crop insurance) तसेच कर्जमाफी मिळावी व तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा , अशी मागणी आम्ही महाविकास आघाडीतर्पेâ निवेदनाद्वारे तहसीलदारांमार्फत सरकारकडे केली आहे. आमच्या मागण्या नाही झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे नेते मारुती पांडे यांनी दिला.