देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur: लातूरमध्ये निघाली ‘सायबर- वाहतूक जनजागृती दिंडी’!
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडालातूर

Latur: लातूरमध्ये निघाली ‘सायबर- वाहतूक जनजागृती दिंडी’!

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/16 at 5:39 PM
By Deshonnati Digital Published July 16, 2024

लातूर(Latur) :- आषाढी एकादशीचे औचित्य साधून लातूर पोलीस (Latur Police) दलाकडून मंगळवारी (दि.16) ‘सायबर- वाहतूक(‘Cyber- Traffic) जनजागृती दिंडी’ काढण्यात आली. आजच्या काळात वाढती “सायबर गुन्हेगारी” चिंतेती बाब आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या आता विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात अडकवतात. त्यामुळे विद्यार्थ्यां बरोबरच प्रौढ व्यक्तीमध्ये व समाजातील प्रत्येक घटकांमध्ये सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती व्हावी, यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात सायबर सुरक्षेबाबत व वाहतुक नियम बाबत जनजागृती करिता आज दिनांक 16 जुलै 2024 रोजी सकाळी दहा ते बारा वाजण्याच्या दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणातून शाळकरी मुलांच्या साह्याने सायबर जनजागृती दिंडी काढून जनजागृती करण्यात आली.

सायबर सुरक्षा संदर्भात माहिती व्हावी हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू

सदर सायबर, वाहतुक नियम जनजागृती दिंडी कार्यक्रमात लातूर शहरातील 5 शाळेच्या 500 विद्यार्थ्यांचा(Students) सहभाग असून यामध्ये सुशीलादेवी देशमुख मूकबधिर विद्यालय लातूर, ग्लोबल नॉलेज पब्लिक इंग्लिश स्कूल लातूर, सदानंद विद्यालय लातूर, देशीकेंद्र शाळा लातूर, शाहू कॉलेज आयटी डिपार्टमेंट च्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. लहान मुलांनी आपली सायबर सुरक्षा (Cyber ​​security) कशी करावी, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सायबर सुरक्षा संदर्भात माहिती व्हावी हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू असून सर्वांनी सायबर सुरक्षित राहणे आवश्यक आहे. असं यावेळी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितले. ऑनलाईन गेमचं वाढलेला प्रमाण वाढले आहे. लहान मुलं ऑनलाईन गेम (Online game) खेळतात.त्या माध्यमातून माहिती गोळा केली जाते. डमी युजर्स क्रियेट केले जातात. ऑनलाईन मोबाईल खेळताना कोणती काळजी घेण्यात यावी, काय करावे आणि काय करू नये. यासंदर्भात पथनाट्य, बॅनर, फ्लेक्स च्या माध्यमाने समाजापर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जनजागृती करण्यासाठी सायबर दिंडीचे आयोजन

सायबर गुन्ह्याच्या पद्धत मध्ये एखादा युजर्स आठव्या वर्गात असेल. तर दुसरा मी ही तुझ्याच वयाचा आहे. तुझे आई-वडील काय करतात. आर्थिक उत्पन्न काय आहे? तुमचे पालक परदेशात गेले होते का ? कार कोणती आहे, अशी माहिती गोळा करण्यात येते. व्हॉट्सअपवर(WhatsApp) नंबर शेअर होतात. समोरच्या व्यक्तीकडून संपूर्ण माहिती घेतात. यामुळे सायबर गुन्हेगारी करण्यास मदत होते. हळूहळू वैयक्तिक माहिती घेतात. लहान मुलांना जाळ्यात ओढले जाते, असं पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितलं. अशाप्रकारे सायबर गुन्ह्याचा विळखा समाजा भोवती आवळला जात आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सायबर दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

“सायबर दिंडी” कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा (Transport Branch) गणेश कदम ,पोलीस ठाणे शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर, भरोसा सेलचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील, सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नलिनी गावडे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी, दंगा नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल, भरोसा सेल, सायबर, वायरलेस, एटीबी पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदारांनी परिश्रम घेतले. यावेळी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

[ruby_related total=5 layout=5]

TAGGED: 'Cyber- Traffic, Cyber ​​security, Latur police, online game, Students, Transport Branch, WhatsApp

वाचण्यासारखी बातमी

School Students
लातूरमराठवाडा

School Students: बस उशिरा सुटली, विद्यार्थी दोन तास अडकले!

November 11, 2025
Pathri Market Committee
मराठवाडापरभणी

Pathri Market Committee: परभणीच्या पाथरी बाजार समितीत अविश्वास ठराव पारित; बाबाजानी दुर्राणींची राजकीय ‘चाल’ यशस्वी!

November 11, 2025
General Election
मराठवाडापरभणी

General Election: परभणी महापालिका सदस्यांचे प्रभाग निहाय आरक्षण आज जाहीर!

November 11, 2025
Maratha Society
नांदेडमराठवाडा

Maratha Society: मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांवर कठोर करावाई करा नांदेडमध्ये सकल मराठा समाजाचे धरणे आंदोलन!

November 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?