लातूर(Latur) :- आषाढी एकादशीचे औचित्य साधून लातूर पोलीस (Latur Police) दलाकडून मंगळवारी (दि.16) ‘सायबर- वाहतूक(‘Cyber- Traffic) जनजागृती दिंडी’ काढण्यात आली. आजच्या काळात वाढती “सायबर गुन्हेगारी” चिंतेती बाब आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या आता विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात अडकवतात. त्यामुळे विद्यार्थ्यां बरोबरच प्रौढ व्यक्तीमध्ये व समाजातील प्रत्येक घटकांमध्ये सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती व्हावी, यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात सायबर सुरक्षेबाबत व वाहतुक नियम बाबत जनजागृती करिता आज दिनांक 16 जुलै 2024 रोजी सकाळी दहा ते बारा वाजण्याच्या दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणातून शाळकरी मुलांच्या साह्याने सायबर जनजागृती दिंडी काढून जनजागृती करण्यात आली.
सायबर सुरक्षा संदर्भात माहिती व्हावी हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू
सदर सायबर, वाहतुक नियम जनजागृती दिंडी कार्यक्रमात लातूर शहरातील 5 शाळेच्या 500 विद्यार्थ्यांचा(Students) सहभाग असून यामध्ये सुशीलादेवी देशमुख मूकबधिर विद्यालय लातूर, ग्लोबल नॉलेज पब्लिक इंग्लिश स्कूल लातूर, सदानंद विद्यालय लातूर, देशीकेंद्र शाळा लातूर, शाहू कॉलेज आयटी डिपार्टमेंट च्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. लहान मुलांनी आपली सायबर सुरक्षा (Cyber security) कशी करावी, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सायबर सुरक्षा संदर्भात माहिती व्हावी हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू असून सर्वांनी सायबर सुरक्षित राहणे आवश्यक आहे. असं यावेळी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितले. ऑनलाईन गेमचं वाढलेला प्रमाण वाढले आहे. लहान मुलं ऑनलाईन गेम (Online game) खेळतात.त्या माध्यमातून माहिती गोळा केली जाते. डमी युजर्स क्रियेट केले जातात. ऑनलाईन मोबाईल खेळताना कोणती काळजी घेण्यात यावी, काय करावे आणि काय करू नये. यासंदर्भात पथनाट्य, बॅनर, फ्लेक्स च्या माध्यमाने समाजापर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जनजागृती करण्यासाठी सायबर दिंडीचे आयोजन
सायबर गुन्ह्याच्या पद्धत मध्ये एखादा युजर्स आठव्या वर्गात असेल. तर दुसरा मी ही तुझ्याच वयाचा आहे. तुझे आई-वडील काय करतात. आर्थिक उत्पन्न काय आहे? तुमचे पालक परदेशात गेले होते का ? कार कोणती आहे, अशी माहिती गोळा करण्यात येते. व्हॉट्सअपवर(WhatsApp) नंबर शेअर होतात. समोरच्या व्यक्तीकडून संपूर्ण माहिती घेतात. यामुळे सायबर गुन्हेगारी करण्यास मदत होते. हळूहळू वैयक्तिक माहिती घेतात. लहान मुलांना जाळ्यात ओढले जाते, असं पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितलं. अशाप्रकारे सायबर गुन्ह्याचा विळखा समाजा भोवती आवळला जात आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सायबर दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
“सायबर दिंडी” कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा (Transport Branch) गणेश कदम ,पोलीस ठाणे शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर, भरोसा सेलचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील, सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नलिनी गावडे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी, दंगा नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल, भरोसा सेल, सायबर, वायरलेस, एटीबी पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदारांनी परिश्रम घेतले. यावेळी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.