शिक्षण उपसंचालकांनी दिले सखोल चौकशीचे आदेश
लातूर (Latur Education) : कोणत्याच गुणवत्तेत बसत नसताना मंत्रालय स्तरावर काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून बाहेरील जिल्ह्यातील शिक्षक मुरुड येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये विषय सहाय्यक म्हणून नियुक्तीवर आले असून यांच्या सखोल चौकशीचे आदेश (Latur Education) लातूरच्या शिक्षण उपसंचालकांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांना दिले आहेत. याबाबत उपसंचालकांकडे रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष भागवत गायकवाड यांनी तक्रार केली होती.
मुरुड येथील जिल्हा शिक्षण (Latur Education) व प्रशिक्षण संस्थेत इतर जिल्ह्यातून प्रतिनियुक्तीवर काही शिक्षक रुजू झाले. या प्रतिनियुक्त्या अनधिकृत असून मंत्रालय स्तरावर काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून व अर्थपूर्ण व्यवहार करून या नियुक्त्या या शिक्षकांनी मिळविल्याचा आरोप गायकवाड यांनी याबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, पुण्याचे शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक आणि मुरुड येथील डाएटच्या प्राचार्यांना गायकवाड यांनी निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत.
याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून अनधिकृतरित्या मुरुडच्या (Latur Education) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रतिनियुक्तीवर आलेल्या बाहेरील जिल्ह्यातील विषय सहाय्यकांची चौकशी करावी. त्यांना प्रतिनियुक्त्या देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करावी, अशी गायकवाड अशी मागणी गायकवाड यांनी केली होती. बाहेरच्या जिल्ह्यातील विशेष सहाय्यक पदाला अपात्र प्राथमिक शिक्षकांची प्रतिनिधी तात्काळ रद्द करावी. त्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात वर्ग करण्यात यावे. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी. तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे; अन्यथा संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल, असा इशारा गायकवाड यांनी निवेदनात दिला होता.
गायकवाड यांच्या या निवेदनाची दखल घेत शिक्षण उपसंचालकांनी मुरुड येथील (Latur Education) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांना पत्र लिहून याप्रकरणी तात्काळ सखोल चौकशी करावी व त्याबाबत चौकशीचा अहवाल आपल्या अभिप्रायासह सादर करावा, असे आदेश दिले आहेत.