डॉ. काळगेच लातूरचे खासदार
लातूर (Latur Election Results) : लातूर लोकसभा मतदारसंघात (Latur Election Results) महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे (Dr. Shivaji Kalge) यांनी महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा पराभव करीत 80 हजारांपेक्षा मताधिक्य मिळवित विजय संपादन केला आहे. त्यामुळे भाजपची विजयाची हॅट्रिक
हुकली असून, काँग्रेसला आपला बालेकिल्ला खेचून आणण्यात यश आले आहे.
राज्यातील प्रमुख लढती पैकी एक असलेल्या (Latur Election Results) लातूर लोकसभा निवडणुकीत सुरुवातीपासूनच चुरस दिसून येत होती. या लढतीत महायुतीकडून सुधाकर शृंगारे यांना पैशाच्या जोरावर उमेदवारी देण्यात आली खरी पण उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच स्थानिक नेत्यांचा या ना त्या कारणाने भाजप मधील अंतर्गत धुसफूस पहावयास मिळाली. याचाच फटका शृंगारे यांना बसलेला दिसत आहे. मतमोजणीत पहिल्या फेरीपासून महाआघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे आघाडीवर होते. त्यांनी ती आघाडी कायम ठेवली व ती आघाडी प्रत्येक फेरीस वाढतच गेली.
लातूरात साज श्रंगार मतदारांनी संपविला दैनिक देशोन्नती चा अंदाज खरा ठरला!
शेवटपर्यंत महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना लीड तोडता आली नाही. विशेष म्हणजे (Latur Election Results) लातूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात महविकास आघाडी पेक्षा महायुतीची ताकत जास्त आहे. लातूर शहर व लातूर ग्रामीण वगळता इतर चारही विधानसभेत महायुतीचा आमदार आहे. असे असतानाही सुरुवातीपासूनच महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे पिछाडीवर राहिले. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराच्या पराभवाचे धनी कोण? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. कारण हेच सुधाकर शृंगारे 2019 च्या लोकसभा निवडणूकीत 2 लाख 89 हजार एवढे विक्रमी मताधिक्य मिळवून विजयी झाले होते. महायुतीच्या उमेदवाराचे हे मताधिक्य तोडून विजय संपादन करणे हे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे (Dr. Shivaji Kalge) यांच्यासाठी सोपे नव्हते. माञ भाजप मधील जिल्ह्यांतर्गत असलेला बेबनाव, नेते, कार्यकर्ते व मतदार यांच्यातील समन्वयाचा अभाव या गोष्टी डॉ. शिवाजी काळगे यांच्या पथ्यावर पडली. याशिवाय या (Election Results) संपूर्ण निवडणूकीची धुरा सांभाळणारे आमदार देशमुख बंधू, यांनी नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबविली. व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. व स्वतः डॉ. शिवाजी काळगे (Dr. Shivaji Kalge) यांची असलेली स्वच्छ प्रतिमा या गोष्टी डॉ. शिवाजी काळगे यांच्या विजयाला हातभार लावणारी ठरली. डॉ. शिवाजी काळगे यांच्या विजयानंतर जिल्हाभरात महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला.
हवा ना लाट इथे आमुचाच थाट
– लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ.अर्चना पाटील चाकूरकर, व शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र समजले जाणारे माजी आमदार बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य असलेल्या लिंगायत समाज भाजपकडे वळेल व त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होईल असे गणित मांडले जात होते. असे असतानाही देशमुख आमदार बंधूंनी संपूर्ण निवडणूकीची धुरा एक हाती सांभाळत काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या लातूर लोकसभेची जागा पुन्हा एकदा खेचून आणली आहे. त्यामुळे (Latur Election Results) लातूरच्या राजकारणात देशमुख कुटुंबाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित असल्याचे सिद्ध झाले आहे.