शेतकऱ्याने चक्क हेलीकॉप्टर मागीतले
रेणापूर/लातूर (Latur Farmer) : यशवंतवाडी ता. रेणापूर येथील शेतकरी ज्योतीराम साहेबराव चव्हाण हे तहसिल कार्यालयासमोर (Tehsil Offices) उपोषणास बसले होते. यात त्यांनी उपोषणस्थळी लावलेल्या बॕनरवर (Latur Farmer) शेतात जाण्यासाठी चक्क हेलिकाॕप्टरची मागणी तहसिलदार यांना केली होती. याची तहसिल परिसरात आलेले नागरीक या मागणीची मोठ्या चवीने चर्चा करत होते.
अंदोलक शेतकऱ्याची रेणापुर तहसीलदाराकडे अनोखी मागणी
यशवंतवाडी ते कारेपुर हा शिवरस्ता खुलाकरून दिला नसल्यामुळे शेतात जाणे-येणे यावरुन (Latur Farmer) शेतकऱ्यांचे वाद होतात. हा रस्ता खुला करुण देण्याची मागणी झाल्यानंतर (Tehsil Offices) तहसिलकडुन पंचनामा करण्यात आला तारीख ही देण्यात आली परंतु भुमि अभिलेख चे कर्मचारी दिलेल्या तारखेला आलेच नाहीत यामुळे चव्हाण यांनी सोमवारी ता. १ तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. यात बॕनरवर सदरील रस्ता खुला करुन हद्दीखुना कायम करुन देण्यात याव्यात मागणी पुर्ण करण्यास शासन असमर्थ असेल तर शेतक-यांना हेलिकाॕप्टर देण्यात यावे, असे बँनरवर लिहिल्याने याची मोठी चर्चा तहसिल परिसरात होती. शेवटी उप अधिक्षक भूमि अभिलेख रेणापूर यांनी उपोषणकर्ते शेतकरी चव्हाण यांना हेलीकॉप्टर देण्यास असमर्थता दर्शविली व १५ जुलै रोजी सदरील रस्ता खुला करुन हद्दी खूना कायम करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतले.