निलंगा (latur heavy rain) : तालुक्यातील विविध गावात शनिवारी सायंकाळी चार वाजता अचानक आलेल्या (Cyclone again) चक्री वादळासह पावसात विद्युत खांब, झाडे उन्मळून पडली तर अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली. चक्री वादळात जवळपास आर्धा तास नागरिकांनी जीव मुठीत धरून पलंगाच्या खाली सहारा घेतला.
तालुक्याला अनेक गावांना चक्रीवादळाचा तडाखा
मागच्या महिना भरापासुन (Nilanga taluka) निलंगा तालुक्यातील विविध गावात वादळी वारे व अवकाळी पाऊस (Heavy unseasonal) कोसळत असून शनिवारी सायंकाळी चार वाजता सुटलेल्या चक्री वादळाने तर कहरच केला. जवळपास आर्धा तास चक्री वादळ व अवकाळी पावसाने आक्षरशहा थैमान घातले. (Cyclone) चक्रीवादळाचा फटका ग्रामीण भागातील घरांना बसला. विशेषतः तालुक्यातील उमरगा (हा), हाडगा, राठोडा, वडगाव अदी गावांना बसला. अनेक सामान्य नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले तर अनेक ठिकाणी विद्युत पोल कोसळले. उमरगा ते हाडगा रोडलगत असलेल्या मेन लाईनचे पाच खांब तारा तुटून रस्त्यावर पडले. अनेकांच्या घरावरील पत्रे उडून जाऊन त्यावरी दगड धोंडे घरात पडून संसार उपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले.
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत
अनेक जण जीव वाचवण्यासाठी घरातील पलंगाच्या खाली बसून आपला जीव वाचवला. (Cyclone) वारे थांबल्यानंतर कोणाच्या घरावरील पत्रे कोठे उडून गेले कळत नव्हते. एकंदरीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने (Heavy unseasonal) जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे..