निलंगा (Nilanga):- सद्गुरु गुरुबाबा महाराज आणि रामकृष्ण महाराज यांच्या वार्षिक उत्सवाची आज निलंगा शहरातून सद्गुरूंच्या पालखीची नगर प्रदक्षिणा होऊन नंतर श्रीक्षेत्र बारव येथे दहीहंडी गोपाळकाला फोडून उत्साहात सांगता झाली.
25 नोव्हेंबर पासून श्रीक्षेत्र निलंगा बारव येथे श्री गुरुबाबा महाराज व रामकृष्ण महाराज यांच्या उत्सवास (celebration) स्थापनेने आरंभ होऊन शुक्रवारी (दि.29) गोपाळकाल्याने हजारोंच्या उपस्थितीत सांगता झाली. यावेळी ज्ञानोबा तुकारामाच्या, सद्गुरूंच्या आणि विठ्ठलाच्या नाम गजराने बारव क्षेत्र परिसर दुमदुमून गेला.
सद्गुरुंच्या वार्षिक उत्सवाची गोपाळकाल्याने सांगता..
पिठाधिपती सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या अधिपत्यात आणि सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनात आणि हभप श्रीरंग महाराज व हभप ज्ञानराज महाराज औसेकर यांच्या सहभागात मोठ्या भक्ती भावाने संपन्न झाला.
या उत्सवात ह भ प श्री भैरवनाथ शेट निटूरकर , हभप श्री ज्ञानराज महाराज औसेकर , हभप श्री श्रीरंग महाराज औसेकर. सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर व सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांची कीर्तन सेवा गुरुबाबा रामकृष्ण महाराज यांच्या समाधी समोर संपन्न झाली.
गुरु म्हणजे शिष्य निर्माण करणारी फॅक्टरी नव्हे : गुरुबाबा महाराज
सद्गुरूंच्या समाधीस्थळी तीर्थक्षेत्री निलंगा किंवा औसा क्षेत्रात भाविक मोठ्या श्रद्धेने येतात आणि त्यांना ताबडतोब उपदेश घेण्याची घाई असते. परंतु गुरु म्हणजे काही शिष्य निर्माण करणारी फॅक्टरी नव्हे. त्यासाठी आधी गळ्यात माळ, पंढरीची वारी, ज्ञानेश्वरीचे पारायण, गाथा वाचन आणि एकादशी या वृतामध्ये आपल्या जीवनाला आणून नंतरच समजून पारखून निर्धार करून गुरु करून घ्यावा व गुरु कडून गुरुमंत्र उपदेश घ्यावा, असे प्रतिपादन नाथ संस्थानचे पीठाधिपती सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांनी निलंगा येथे गोपाळकाल्याच्या पूर्वी कीर्तनात केला.
हजारो भक्तांनी घेतला काल्याचा प्रसाद
कीर्तनानंतर गुरुबाबांनी श्री रामकृष्ण गुरुबाबा महाराज यांच्या समाधी संमुख चक्रीभजनाची सेवा करून नंतर पालखीसह निलंगा नगर प्रदक्षिणेसाठी दिंडी निघाली शहरातील मुख्य रस्त्यावरून भावी भक्त महिला दिंडीचे व गुरुबाबांचे स्वागत करण्यासाठी व दर्शनासाठी दुतर्फा गर्दी करून होते. नंतर दिंडी बारवात येऊन खेळ खेळूया, फुगडी, हमाम, भुलई व काल्याचा अभंग होऊन दहीहंडी काला फुटला. यावेळी हजारो भक्तांनी सद्गुरूंचे स्मरण व दर्शन घेऊन काल्याचा प्रसाद घेतला.