हेर (Latur Missing case) : वयाच्या अवघ्या १५ वर्षी, इयत्ता ९ वीत शिकणारा एक मुलगा तब्बल ३५ वर्षानंतर घरी सुखरूप परत आल्याची दुर्मिळ घटना (Missing case) हेर येथे घडली असून, (Baban gurade) बबनला भेटण्यासाठी नातलगांसह मित्र परिवाराची एकच गर्दी होत आहे.
माहितीनुसार, उदगीर तालुक्यातील हेर येथील (Baban gurade) बबन तुळशीराम गुरडे हा वयाच्या १५ व्यां वर्षी म्हणजेच १९८९ साली अचानक कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेला. घरच्यांनी बबनचा अनेक वर्षे शोध घेतला. पण त्याचा कुठेच ठाव ठिकाणा लागत नव्हता. (Missing case) इतके वर्षे निघून गेले पण त्याचा शोध लागत नसल्याने घरच्यांनी पण बबन जिवंत असेल, याची आशा सोडून दिली. काळा मागून काळ निघून जात होता. यातच पुत्र वियोगतच काही वर्षांपूर्वी बबन याचे वडील तुळशीराम गुरडे यांचे निधन झाले. आणि अचानक तब्बल तीन दशके उलटल्यानंतर बबन सुखरूप घरी परतला.
इतके दिवस बबन (Baban gurade) हा गुजरातमध्ये छोटी मोठी कामे करत होता. काही वर्षांपूर्वी त्याने ड्रायव्हारचे प्रशिक्षण घेऊन सध्या तो खाजगी वाहने चालवत असल्याचे त्याने सांगितले. ३५ वर्षानंतर अचानक त्याला परिवाराची, नातलगाची, मित्र परिवार आणि (Missing case) गावाची आठवण येऊ लागल्याने त्याने सरळ गावचा रस्ता धरला. आणि चौकशी करत त्याने मंगळवारी (दि.९) आपले घर गाठले. बबन सुखरूप परत आल्याचे पाहून त्याच्या आईसह भावंडाना आनंदाश्रू आनावर झाले होते. मुलाला घट्ट मिठी मारत वयोवृध्द आईने देवाचे आभार मानले. तब्बल ३५ वर्षानंतर बबन (Baban gurade) घरी परत आल्याचे समजताच नातलागासह मित्र परिवार आणि गावकऱ्यांनी त्याला भेटण्यासाठी एकच गर्दी केली.