शासकीय निवासस्थानी रात्रीची घटना, प्रकृती गंभीर
लातूर (Latur Municipal Commissioner) : महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे (Dr. Babasaheb Manohare) यांनी शनिवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. ही घटना बार्शी रोडजवळील (Latur Municipal) शासकीय निवासस्थानी घडली असून, त्यावेळी सुरक्षारक्षकासह परिवारातील सदस्यांनी मनोहरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असल्याचे सह्याद्री हॉस्पिटल चे डॉ. किनीकर यांनी सांगितले.
प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी स्वतःच डोक्यात गोळी झाडल्याचे दिसून येत आहे, असे पोलिस म्हणाले. आयुक्त मनोहरे यांनी २० ऑक्टोबर २०२२ रोजी लातूर महापालिकेत पदभार स्विकारला होता. नुकताच २७मार्च रोजी त्यांनी मनपाचा अर्थसंकल्प सादर केला. शनिवारी सुटी असल्याने ते घरीच होते. घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मुंडे, (Latur Municipal) महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी तातडीने सह्याद्री हॉस्पिटल मध्ये पोहोचले.
व्हेंटिलेटरवर…
आयुक्त मनोहरे (Dr. Babasaheb Manohare) यांना तातडीने सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असून, ते व्हेंटिलेटरवर आहेत. उपचार करणारे न्यूरोसर्जन डॉ. हणमंत किनीकर म्हणाले, उजव्या कानशिलाच्या बाजूने गोळी आत जावून डावीकडे वरच्या बाजूने गेली आहे. प्रकृती गंभीर असली तरी त्यांच्या मोठ्या रक्तवाहिनीला दुखापत नाही. त्या रक्तवाहिनीच्या जवळून गोळी गेली आहे. प्रयत्न सुरू आहेत. प्रकृतीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे, असेही डॉ. किनीकर म्हणाले.
घटनेच्या वेळी दरवाजा बंद… कारण अस्पष्ट!
आयुक्त मनोहरे (Dr. Babasaheb Manohare) यांनी डोक्यात गोळी झाडली त्यावेळी त्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. आवाज आल्यानंतर सुरक्षा रक्षक आणि कुटुंबियांनी दरवाजा तोडून त्यांना रूग्णालयात आणले. आयुक्त मनोहरे यांच्या कामाची शैली माहित असणाऱ्या अधिकाऱ्यांनी ही घटना धक्कादायक असल्याचे सांगितले. हा प्रकार घडला त्यावेळी (Latur Municipal) निवासस्थानी पत्नी आणि दोन्ही लहान मुले होती. या घटनेचे कारण अद्यापही अस्पष्टच आहे.