लातूर (Latur):- संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या नीट (NEET Exam)परीक्षा पेपर फुटी प्रकरणातील संशयास्पद हालचाली लातुरातून झाल्या असल्याचे लक्षात आल्याने चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या दोन शिक्षक, धाराशिव आणि दिल्ली येथील प्रत्येकी एकजण अशा चार संशयितांविरोधात लातुरात गुन्हा दाखल(Filed a case) करण्यात आला आहे. मात्र याबाबत गुन्हा दाखल झालेल्या शिवाजीनगर पोलिसांना अधिक माहिती विचारली असता त्यांनी ‘तोंडावर बोट ठेवणे’ पसंत केले.
दोन शिक्षकांसह चौघांविरोधात गुन्हा; पोलिसांचे तोंडावर बोट!
वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट परीक्षा देशभरातील २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली. निकालानंतर ग्रेस गुण आणि काही राज्यांमध्ये झालेल्या पेपरफुटीच्या चर्चेनंतर नीटमध्ये गडबड झाल्याचा संशय वाढला. परराज्यात जाऊन परीक्षा देणे, वाढलेला निकाल या संदर्भाने चर्चा सुरु असून, गुजरात(Gujarat), पंजाब(Punjab), हरियाणा (Hariyana) व बिहार (Bihar)राज्यात पेपरफुटीच्या तक्रारी झाल्या. गुन्हेही दाखल होत आहेत. महाराष्ट्रातही ‘एटीएस’च्या पथकाने तपास सुरु केला आहे. यावरून लातूरमधून दोघां शिक्षकांना ताब्यात घेतले. चौकशी करुन सोडून दिले व लागलीच पुन्हा अटक करीत गुन्हा नोंद करण्यात आला.
दोन शिक्षकांना ताब्यात घेत यांचे मोबाईल डिटेल्स, चॅटिंग, बँक खाते याची चौकशी केली
चौकशीचा अधिकचा तपशील समोर आलेला नाही. घडल्याप्रकाराशी त्या दोघांचा संबंध आहे अथवा नाही याचा खुलासाही तपासाअंती होईल, अशी माहिती शनिवारी पोलिसांनी दिली होती. मात्र रविवारी या शिक्षकांकडे कांही संशयित बाबी आढळून आल्याने त्यांना पुन्हा ताब्यात घेत या दोन शिक्षकांसह धाराशिव आणि दिल्ली (Delhi)येथील एकेकजण अशा चार जणांविरोधात लातुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र एटीएस अधिकाऱ्यांनी सदर दोन शिक्षकांना ताब्यात घेत यांचे मोबाईल डिटेल्स, चॅटिंग, बँक खाते याची चौकशी केली असता यातील पठाण या शिक्षकाकडे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे अडमिट कार्ड ()आढळून आल्याची चर्चा आहे. तसेच सदरच्या शिक्षकांकडून संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे लक्षात आल्याने लातूरच्या दोघांसह चौघां जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीट परीक्षा उत्तीर्ण होऊन वैद्यकीय प्रवेश सुलभ व्हावा यासाठी देशभरातून विद्यार्थी लातूर येथील महाविद्यालये तसेच खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. या प्रकारमुळे लातूरच्या गुणवत्तेस गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.