लातूर (Latur):- प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई (action)करावी, अशी मागणी सकल ओबीसी (OBC)समाजाने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की आहे की, ओबीसीचे वरिष्ठ नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर कंधार तालुक्यातील नांदेड जिल्ह्यातील बाचोटी या गावी मराठा समाजातील कथित गुंडांनी भ्याड हल्ला केला आहे. या भ्याड हल्ल्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करीत आहोत.
ओबीसी समाजाची मागणी
आम्ही आमची मागणी कायदेशीर रित्या शासनाकडे मांडत आहोत. आमच्यामध्ये संस्कार आहे. शांतता आहे, ध्येय आहे, साहस आहे. मात्र मराठा समाज कुठल्याही प्रकारे नियमात न बसणारी मागणी शासनाकडे करीत असून त्यांच्याकडे दंडेलशाही, गुंडशाही, हुकूमशाही दिसते, हे योग्य नाही. आम्ही मराठा समाजाच्या मागणीविरुद्ध नाही, ओबीसींचे आरक्षण काढून मराठ्यांना देण्यात येऊ नये, एवढेच आमचे म्हणणे आहे.
7 नोव्हेंबर 2024 रोजी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बाचोटी या गावांमध्ये आमचे ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके हे प्रचारासाठी फिरत असताना तेथील मराठ्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करून भ्याड हल्ला केलेला आहे. प्राणघातक हल्ला करणाऱ्या व्यक्तींना तात्काळ प्रशासनाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी; अन्यथा आम्हाला सुद्धा जशाच तसे उत्तर द्यावे लागेल असा इशारा निवेदनात दिला आहे. या निवेदनावर सुदर्शन बोराडे, दगडूसाहेब पडिले, भारत काळे आदींच्या सह्या आहेत.